Sharad Pawar, Mumbai : "मी संसदेचे विशेष अधिवेशन (special session on parliament) बोलावण्यात यावे, या मागणीच्या विरोधात नाही...पण हा एक संवेदनशील आणि गंभीर मुद्दा आहे आणि संसदेत अशा गंभीर विषयावर चर्चा करणे शक्य नाही...अशा परिस्थितीत, राष्ट्रीय हितासाठी माहिती गुप्त ठेवणे आवश्यक आहे...विशेष अधिवेशन बोलावण्याऐवजी, सर्वपक्षीय बैठक बोलावरली तर बरे होईल ", असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले आहेत. ते मुंबईत (Mumbai) पत्रकार परिषदेत बोलत होते. 






शरद पवार म्हणाले, विशेष अधिवेशन बोलवायला हरकत नाही पण त्यात किती माहिती दिली जाईल हे सांगता येत नाही. अनेक संरक्षणाशी संबंधित माहिती देता येत नाही. त्यामुळे त्या गोपनीय ठेवाव्या लागतात. त्यापेक्षा सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलवून माहिती दिली गेली पाहिजे. सरंक्षण अधिकारी यांना बोलावून त्यांच्याकडून माहिती दिली गेली पाहिजे. काय स्थिती आहे आपण काय केले आहे याची माहिती दिली पाहिजे.


पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, सिमला करार हा भुत्तो आणि श्रीमती गांधी यांच्यात झाला. त्यात आमच्या देशाचे मुद्दे आम्ही सोडवू. आमचा विषय तो आम्ही सोडवू त्यात इतरांनी नाक खूपसण्याचे कारण काय? पंतप्रधानांचे भाषण तुम्ही ऐका मी ही ऐकतो त्यानंतर बोलू.. माहिती तर दिली गेली पाहिजे, असंही शरद पवार म्हणाले आहेत. 


"आतापर्यंत आम्ही कधीही कोणत्याही तिसऱ्या पक्षाला आमच्या देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याची परवानगी दिलेली नाही. परंतु अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आमच्या अंतर्गत बाबींबद्दल काही बोलण्याची ही पहिलीच वेळ आहे",असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.  




इतर महत्त्वाच्या बातम्या 


हे ठीक नाही, अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर शरद पवार स्पष्टच बोलले; शिमला कराराची करुन दिली आठवण