Sharad Pawar Resigns : महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार (Sharad Pawar) यांची मुरलेला राजकारणी अशी ओळख आहे. अनेक धक्कादायक निर्णय घेण्यात त्यांचा हातखंडा आहे. असाच निर्णय आज त्यांनी जाहीर केला आणि राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं. मुंबईतील वाय बी सेंटर इथे 'लोक माझे सांगाती' (Lok Maze Sangati) या शरद पवारांच्या (Sharad Pawar Autobiography) आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीचे आज प्रकाशन झाले. त्यावेळी केलेल्या भाषणात पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आणि सभागृहात एकच गोंधळ उडला. शरद पवार यांच्या या निर्णयाला कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी जोरदार विरोध केला. इतकंच नाही जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे यांच्यासह अनेक नेत्यांना अश्रू अनावर झाले. आपल्या भावना व्यक्त करताना ते ढसाढसा रडू लागेल.


मी तुमच्यासोबत आहे : शरद पवार


मी स्पष्ट केलं आहे की आपण एकत्र काम करणार आहोत. मी केवळ पदावरुन बाजूला होत आहे. मी तुमच्यासोबत आहे, असं आश्वासन शरद पवार यांनी दिलं. परंतु निवृत्त मागे घेण्याची घोषणा मात्र त्यांनी केली नाही.


जाणून घेऊया कोण काय म्हणाले?


सुनील तटकरे
अत्यंत क्लेशकारक दिवस आहे. देशाची आणि राज्याची गरज लक्षात घेतली तर आपली गरज आहे. 63 वर्षांच्या कालावधीच सत्तेत काम केलंत. आपण वरांवर सांगता आपण सोबत आहात. परंतु वटवृक्षाची आम्हाला गरज आहे.


हसन मुश्रीफ
अचानक आपण निर्णय घेतला आहे हे मान्य होणारे नाही


दिलीप वळसे पाटील
देशातील कुणालाच आपला निर्णय मान्य नसेल. गोरगरीब जनतेसाठी आपण आधार उभा केला. शेतकऱ्याची काळजी केली. प्रत्येकाची काळजी केली. आता वेळ अशी आली आहे की, देशपातळीवर सर्वांना एकत्र करण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळें आपण निर्णय मागे घ्यावा ही विनंती करतो.


नरहरी झिरवाळ
आमच्या काही चुका झाल्या असतील तर माफी मागतो आणि आपण निर्णय मागे घ्यावा ही विनंती करतो.


धनंजय मुंडे
देशावर संकट असताना अध्यक्षपदावरुन जाणं योग्य नाही. त्यांनी निर्णय मागे घ्यावा.


अजित पवार 
सगळ्यांच्या भावना साहेबांनी ऐकल्या आहेत. तुम्ही गैरसमज करुन घेत आहेत. शरद पवार अध्यक्ष नाहीत म्हणून पक्षात नाही असं नाही. शरद पवार बाजू जाणार नाहीत. नवीन नेतृत्वाकडे संधी दिली जाणार आहे. उद्या येणारा नवीन अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालणार आहे. शरद पवार यांनी म्हटलं आहे की भाकरी फिरवायची वेळ आली आहे. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष काम करेल. देशभरात मीटिंग करणं, लोकांना भेटणं सुरु राहिल. कुणी पण अध्यक्ष झालं प्रांताध्यक्ष झालं तरी शरद पवार यांच्याच जीवावर पक्ष चालणार आहेत. प्रमुखांना एकत्र बसवून निर्णय घेत असतात आणि आज अचनक हा निर्णय घेतला यांची कुणाला माहिती नव्हती. भाकरी फिरवायची म्हणाले मात्र स्वतःपासून फिरवून. उद्या नवीन अध्यक्ष झाला तर अडचण काय आहे? शरद पवारांनी हाक दिल्यावर सगळे एकत्र येणार आहेत. खासदारकी, आमदारकीबाबत सर्व निर्णय त्यांच्याबाबत तेच घेतील. हा निर्णय कालच होणार होता मात्र काल 1 मे रोजी वज्रमूठ सभा असल्यामुळे झाला नाही. आज ना उद्या हे होणार होतं.


रामराजे
1999 साली मी आलो त्यावेळी सांगितलं होतं की आपल्या भोवती हे सर्व फिरणार आहे. आपण पदावरुन कुठेही जाऊ नये


निवृत्तीची घोषणा करताना शरद पवार काय म्हणाले?


"1 मे 1960 ते 1 मे 2023  इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर, कुठेतरी थांबायचा विचार सुद्धा केला पाहिजे, माणसाला अधिक मोह असू नये, आणि इतकी वर्ष संधी मिळाल्यानंतर आणखी मोह ठेवण्यासंबंधीची भूमिका मी काही कधी घेणार नाही... आणि त्यामुळे तुम्हाला अस्वस्थता कदाचित वाटेल, पण मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त व्हायचा निर्णय आज घेतलेला आहे," असं शरद पवार निवृत्तीची घोषणा करताना म्हणाले.