Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) पक्ष, चिन्ह याबाबत आज निवडणूक आयोगात (Election Commission) सुनावणी पार पडणार आहे. सुनावणीपूर्वी शरद पवार गटानं (Sharad Pawar Group) अजित पवार गटाला घेरण्याची रणनिती आखली असल्याची माहिती मिळत आहे. सुनावणीवेळी शरद पवार गट अजित पवार गटाच्या (Ajit Pawar Group) शपथपत्रांचा मुद्दा पुन्हा अधोरेखित करणार आहे. तसेच, खोटी शपथपत्र (Affidavits) दाखल असतील तर पहिल्यांदा त्यावर सुनावणीची मागणीही शरद पवार गटाकडून केली जाणार आहे. 


शरद पवार गट अजित पवार गटाला अडचणीत आणण्यासाठी एक मोठी खेळी खेळणार आहे. शरद पवार गट अजित पवार गटाच्या वतीनं दाखल केलेल्या शपथपत्रांचा मुद्दा पुन्हा एकदा आजचा सुनावणीत अधोरेखीत करणार असल्याची माहिती मिळत आहे. जर निवडणूक आयोगात खोटी शपथपत्र दाखल करण्यात आली असतील, तर पहिल्यांदा त्या मुद्द्यावर सुनावणी घ्यावी, अशी मागणीही शरद पवार गटाच्या वतीनं करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच, खोटी शपथपत्र दाखल करणं कलम 340 अन्वये गुन्हा असल्याची बाब आयोगाचा निदर्शनास आणून देणार असल्याची माहितीही मिळत आहे. आयोगाला खोटी शपथपत्र सादर करण्यात आली असल्याचं निदर्शनास आल्यास मुख्य सूनावणी बाजूला ठेवून खोटी शपथपत्र सादर केल्याचा मुद्द्यावर आधी सुनावणी घेण्याचा अधिकार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  


राष्ट्रवादीतील अंतर्गत फुटीनंतर शिवसेनेप्रमाणेच इथेही दोन गट पाहायला मिळाले. एक शरद पवार गट आणि दुसरा अजित पवार गट. दोन्ही गटांकडून वार, पलटवार केले जात आहेत. अशातच सध्या राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहे. आज निवडणूक आयोगात ही सुनावणी पार पडणार आहे. सुनावणीत शरद पवार गट अजित पवार गटाला पूर्णपणे घेरण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. 


शरद पवार गटातील 4 जणांची खासदारकी रद्द करा, अजित पवार गटाची मागणी


शरद पवार गटाविरोधात अजित पवार गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. शरद पवार गटानं अजित पवार गटाचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांना अपात्र ठरवण्यासंदर्भात राज्यसभेच्या सभापतींना एक पत्र लिहिलं. आता यालाच अजित पवार गटाकडून पलटवार करत प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. शरद पवार गटातील नेत्यांची खासदारकी रद्द करा, अशी मागणी करणारी याचिका अजित पवार गटानं लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापतींकडे केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या याचिकेत अजित पवार गटाकडून शरद पवार, सुप्रीया सुळे यांची नावं वगळण्यात आली आहेत.  


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


NCP Political Crisis: शरद पवार गटातील 4 जणांची खासदारकी रद्द करा, अजित पवार गटाची मागणी, शरद पवार, सुप्रीया सुळे अन् अमोल कोल्हेंना मात्र वगळलं