मुंबई : राष्ट्रवादीच्या गटाकडूनही (NCP Political Crisis) मुंबई अध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरु झाल्यात. राखी जाधव (Rakhi Jadhav) यांची अध्यक्षपदी नेमणूक होण्याची शक्यता आहे. तर अजित पवार(Ajit Pawar) गटाकडून समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांची नियुक्ती करण्यात आलीय. नवाब मलिक वैद्यकीय जामिनावर असल्यामुळे शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून नव्या चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता आहे.


अजित पवार गटाकडून मुंबई अध्यक्ष पदी नवाब मलिक यांच्या ऐवजी समीर भुजबळ यांची नियुक्ती केल्यानंतर शरद पवार गटाकडून देखील अध्यक्ष बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहेय  मुंबईत आज दुपारी वाजता शरद पवार यांच्या उपस्थितीत घोषणा होण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाकडून आज मुंबईतील सर्व वॉर्ड अध्यक्षांच्या उपस्थितीत सभेचं आयोजन करण्यात आले आहे. 


राखी जाधव यांच्या नावाती चर्चा अनेक दिवसांपासून


राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर या पदाचा अतिरिक्त कार्यभार आता राखी जाधव यांच्याकडे जाण्याची चर्चा होत्या. आता पुन्हा या चर्चांना उधाण आले आहे. राखी जाधव या मुंबई महापालिकेच्या राष्ट्रवादीच्या गटनेत्या आहेत. 


कोण आहेत राखी जाधव?


 राखी जाधव या मुंबई महापालिकेच्या राष्ट्रवादीच्या गटनेत्या आहेत.  राखी जाधव घाटकोपरमधून तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. खासदार सुप्रिया सुळेंच्या त्या जवळच्या मानल्या जातात. 


नवाब मलिकांची भूमिका तटस्थ


दरम्यान, नवाब मलिक जेलमधून जरी बाहेर आले असले तरी वैद्यकीय कारणास्तव सध्या ते पक्षीय कामकाजात सहभागी होताना दिसत नाहीत. त्यामुळे मुंबई अध्यक्षपदी दुसऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत  आहे. 5 ऑगस्ट 2019 रोजी नवाब मलिक यांची राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर मनी लाँड्रिंग प्रकरणात फेब्रुवारी 2022 मध्ये अटक झाल्यानंतर नवाब मलिक तुरुंगात होते. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात त्यांना वैद्यकीय आधारावर सुप्रीम कोर्टाकडून दोन महिन्यांचा जामीन मिळाला. परंतु राष्ट्रवादीतीली फुटीनंतर आपला पाठिंबा कोणाला याबाबत त्यांनी अद्याप जाहीर केलेलं नाही.


हे ही वाचा :                                              


माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकरांचे अजित पवारांवर अप्रत्यक्षरित्या गंभीर आरोप..2010 मध्ये येरवडा कारागृहाशेजारील जमीन खासगी बिल्डरला विकल्याचा बोरवणकरांचा आरोप