मुंबई : शरद पवारांच्या (Sharad Pawar NCP) राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभा निवडणुकीसाठी (NCP Lok Sabha candidate list)  पहिले 9 संभाव्य उमेदवार ठरले आहेत. या 9 जणांच्या यादीत शरद पवारांनी सरप्राईज नावं दिली आहेत. महत्त्वाचं म्हणजे राज्यभरात चर्चेत असलेल्या माढा लोकसभेची (Madha Lok Sabha) जागा शरद पवारांनी महादेव जानकर (Mahadev Jankar) यांच्या रासपसाठी सोडली आहे. भाजप, शिवसेना आणि अजित पवारांच्या महायुतीसाठी हा मोठा धक्का असेल. याशिवाय पहिल्या 9 जणांची संभाव्य यादी एबीपी माझाच्या हाती लागली आहे. यामध्ये बारामती, माढा, सातारा, शिरुर, नगर दक्षिण, बीड आणि वर्धा या जागांचा समावेश आहे.  


बारामतीत ठरल्याप्रमाणे खासदार सुप्रिया सुळे, माढ्यातून महादेव जानकर, साताऱ्यातून माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील किंवा श्रीनिवास पाटील हे उमदेवार असतील. तर तिकडे शिरुरमधून अमोल कोल्हे, नगर दक्षिणमधून निलेश लंके, बीडमध्ये बजरंग सोनावणे किंवा ज्योती मेटे तर वर्ध्यातून अमर काळे हे उमेदवार असू शकतात. 


जागा आणि संभाव्य उमेदवार 


बारामती-सुप्रिया सुळे 


माढा-महादेव जानकर(रासप) 


सातारा-बाळासाहेब किंवा श्रीनिवास पाटील 


शिरुर-अमोल कोल्हे


नगर दक्षिण-निलेश लंके 


बीड-बजरंग सोनवणे किंवा ज्योती मेटे 


वर्धा-अमर काळे 


दिंडोरी- 


रावेर -  


महाविकास आघाडीत कुणाला किती जागा? 


दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात कुणाला किती जागा मिळणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही. विविध फॉर्म्युले समोर येत आहेत, पण तिन्ही पक्षांकडून अधिकृत आकडा जाहीर केलेला नाही. त्याआधीच काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांनी आपआपले उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसने सात जणांची पहिली यादी कालच जाहीर केली. 


काँग्रेसची 7 जणांची यादी


काँग्रेसने महाराष्ट्रातील 7 उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी 21 मार्चला जाहीर केली. यामध्ये पुण्यातून रवींद्र धंगेकर, सोलापुरातून प्रणिती शिंदे,  कोल्हापूरमध्ये शाहू महाराज,  लातूरमधून शिवाजीराव कळगे, नंदुरबारमधून गोवळ पाडवी, अमरावतीमधून बळवंत वानखेडे आणि अशोक चव्हाणांच्या नांदेडमध्ये वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झाली. 


उद्धव ठाकरेंकडून सांगलीचा उमदेवार जाहीर 


तिकडे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगली लोकसभेचा उमदेवार जाहीर केला आहे.  कोल्हापूरची सीटिंग जागा काँग्रेसला सोडल्यानंतर, शिवसेना ठाकरे गटाने सांगलीच्या जागेवर दावा केला. त्यानुसार सांगलीतून उद्धव ठाकरे यांनी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली.


संबंधित बातम्या