Sharad Pawar on CAA : केंद्रीय गृहमंत्रालयाने आज (दि.11) सीएएच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना काढली आहे. दरम्यान सीएएच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. "निवडणूक आयोग येत्या तीन चार दिवसांमध्ये निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याची वेळ आली असताना अशाप्रकारचा निर्णय घेऊन मोदी सरकारने संसदीय लोकशाही पद्धतीवर हा सूड आहे. ज्याचा आम्ही निषेध करतो", असं शरद पवार म्हणाले. ते बारामती येथे बोलत होते.
संस्थांची प्रतिष्ठा राज्यकर्ते ठेवत नाहीत
शरद पवार म्हणाले, नवीन संसदेत लोकसभा आणि राज्यसभा एकत्र येऊ नये अशी व्यवस्था मोदींनी केली. याआधी आम्ही सगळे जाऊन गॅलरीत जाऊन बसायचो. या संस्थांची प्रतिष्ठा राज्यकर्ते ठेवत नाहीत. आज देशाचे संविधान वाचवायचे आहे. चांगले प्रतिनिधी निवडून दिले पाहिजेत. लोकांना बदल हवा आहे पण बदल असलेली विचारधारा त्यांना हवा आहे, असंही पवार यांनी नमूद केलं.
वय झालं असे सांगत आहेत, वयाची चिंता मी करत नाही. वयाच्या 26 व्या वर्षी मला निवडून पाठवले. मी नुकताच कॉलेजमधून बाहेर पडलो. पण माझी निवडणूक शिक्षित लोकांनी हातात घेतली. तेव्हापासून आजपर्यंत तुम्ही एकही दिवस मला सुट्टी दिली नाही. साल गड्याला सुट्टी देता पण मला तुम्ही दिली नाही, असे अनुभव शरद पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले.
शिक्षण, कृषी क्षेत्रात कामं केलं
माझा एक स्वभाव आहे चांगले लोक सोबत घ्यायचे आणि त्यांच्यावर जबाबदारी टाकायची. प्रश्न आला मार्ग काढायचा. दुसऱ्यावर जबाबदारी द्यायचं परिणाम आजचे चित्र आहेत. संसदेत सुप्रिया 11 ते 6 बसलेली असते. मी 11 ते 6 बसत नाही. संसदेला आज गंभीरपणे घेण्याची गरज आहे. सुप्रिया सखोल अभ्यास करते आणि प्रश्न मांडते, असेही पवार यांनी नमूद केले.
संसद आणि संविधान याची प्रतिष्ठा राखण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत
वकिलांनी देशाच्या क्रायसिसमध्ये चांगली आणि महत्वाची भूमिका पार पाडली. Crisisच्या काळात देशाला दिशा दिली आहे. संसद आणि संविधान याची प्रतिष्ठा राखण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. देशाच्या दृष्टीने मी पक्षाचा विचार करीत नाही. उपाध्याय यांनी प्रभाव करणारे निर्णय घेतले.Cji यांना सरकारने काढले याच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. Cji यांना काढायचा आणि प्रधानमंत्री आणि मंत्री आणि विरोधी पक्षनेते यांना घेऊन निर्णय घेतला. राष्ट्रीय गरजेची स्थिती निर्माण झाली आहे त्या दृष्टीने पावले टाका, असेही पवार यांनी सांगितले.