Pune Election 2026: पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत (Pune Municipal Corporation Election 2026) दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चेला सध्या जोरदार उधाण आलं आहे. दरम्यान, राज्याचे लक्ष लागलेल्या पुणे महापालिकेसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना (Pune Election2026) आता वेग आला असून या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीच्या (NCP) युती संदर्भात अतिशय महत्वाची माहिती समोर आली आहे. पुण्यात अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची युती होणार असल्याची चर्चा सुरू असताना त्यावर आता जवळ जवळ शिक्कामोर्तब झाल्याचे चित्र आहे. तसे संकेत अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यावरही शहर अध्यक्ष सुभाष जगताप (Subhash Jagtap On Pune Election) यांनी दिले असून या युतीच्या मुहूर्तही त्यांनी सांगितलाय.

Continues below advertisement

Subhash Jagtap On Pune Election :  25 किंवा 26 तारखेला दोन्ही राष्ट्रवादीची युती जाहीर होणार

दोन्ही पक्षाच्या नेत्यांची रात्री बैठक झाली. दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र लढण्याबाबत ठरवलं आहे. जागा वाटपासाठी दोन-दोन पावलं आम्ही मागे घेणार आहोत. त्या अनुषंगाने पक्षाची तयारीही झाली आहे. किंबहुना येत्या 25 किंवा 26 तारखेला दोन्ही राष्ट्रवादीची युती जाहीर होणार असल्याची माहिती अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष सुभाष जगताप यांनी दिली आहे.

Continues below advertisement

दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर मी पक्षाचा राजीनामा देईल असा निर्वाणीचा इशारा शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिला आहे. पुण्यात भाजपला (BJP) शह देण्यासाठी अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवार आणि काँग्रेस यांच्यासोबत एकत्र मोट बांधण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. मात्र, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रसेच्या या एकत्रीकरणाला प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी सुरुवातीपासूनच कडाडून विरोध केला आहे. या मुद्दयावर बोलताना सुभाष जगताप म्हणाले कि, प्रशांत जगताप कालच्या बैठकीला नव्हते. विशाल तांबे, वंदना चव्हाण यांच्यासोबतही आमची बैठक होणार आहे. 25 किंवा 26 तारखेला दोन्ही राष्ट्रवादीची युती जाहीर होणार, असेही ते म्हणाले. सोबतच पक्षाच्या तयारीची माहितीही प्रशांत जगताप यांनी दिली. त्यामुळे एकीकडे विरोधाची किनार असताना आता यावर शरद पवार गटाकडून (Sharad Pawar Camp) कशाप्रकारे तोडगा काढला जाणार, हे बघावे लागेल. तसेच प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिल्यानंतर ते कोणता राजकीय पर्याय आजमवणार याबद्दलही अनेकांना उत्सुकता आहे. 

आणखी वाचा

वडील उमेदवारांच्या मुलाखती घेणार अन् मुलगा भाजपमधून लढणार हे कसे चालेल? बापूसाहेब पठारेंवर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांची नाराजी, थेट प्रदेशाध्यक्षांना धाडलं पत्र