Pune: पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत (Pune Municipal Corporation Election 2025) आंदेकर कुटुंबातील व्यक्तीला तिकीट देऊ नका, अशी विनंती आयुष कोमकरच्या (Ayush Komkar) आई संजीवनी कोमकर यांनी राजकीय पक्षाकडे केली आहे. पुण्यातील माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांचा नातेवाईक असलेल्या गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याची गोळीबार करून हत्या करण्यात आली होती. या हत्येमुळे पुण्यासह राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. यात गोळीबाराच्या घटनेनंतर आंदेकर टोळीतील वाद अधिक चिघळला. या प्रकरणात बंडू उर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर (70, रा. नाना पेठ) याच्यासह 13 जणांविरोधात खून आणि मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान आता आयुष कोमकरच्या आई कल्याणी कोमकर यांनी राजकीय पक्षाकडे विनंती कर निर्वाणीचा इशारा दिला आहे.

Continues below advertisement

Pune Ayush Komkar Case : न्याय देता येत नसेल तर आमच्यावरती अन्याय तरी करू नका, अन्यथा मी....

पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर यांच्या कुटुंबातील दोन महिलांना आगामी पुणे महापालिका निवडणूक लढवण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे. बंडू आंदेकर यांच्यासह माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर आणि माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली आंदेकर या तिघांना निवडणूक रिंगणात उतरण्यास न्यायालयाने हिरवा कंदिल दाखवला आहे. दुसरीकडे आगामी महापालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून आंदेकर कुटुंबातील दोन सदस्य निवडणूक रिंगणामध्ये उतरण्याची चर्चा आहे. परिणामी याच विषयावर बोलताना आयुष कोमकरच्या आईने राष्ट्रवादीसह राजकीय पक्षांना विनंती केली आहे कि, सर्व राजकीय नेत्यांना माझी कळकळीची विनंती आहे जर आम्हाला न्याय देता येत नसेल तर आमच्यावरती अन्याय तरी करू नका. अंधेकरांना निवडणुकीचे तिकीट देऊ नका. माझ्या लहान मुलाचं त्यांनी आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. तरीही असं झाल्यास मी आत्मदहन करून आयुष्य संपवेल, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतलाय. त्यामुळे आता या प्रकरणी राजकीय पक्षाकडून या विनंतीची कितपत दखल घेतली जाते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Continues below advertisement

Pune Crime News : नेमकं प्रकरण काय?

माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा नातेवाईक असलेल्या गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याची गोळीबार करून हत्या करण्यात आली होती. या हत्येमुळे आंदेकर टोळीतील वाद अधिक चिघळला. या प्रकरणात बंडू उर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर (70, रा. नाना पेठ) याच्यासह 13 जणांविरोधात खून आणि मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खटल्यातील आरोपी आणि बंडू आंदेकर याचा मुलगा कृष्णा उर्फ कृष्णराज आंदेकर (36) हा आयुषच्या खुनानंतर फरार झाला होता. काही दिवसांपूर्वी बंडू आंदेकर याने सार्वजनिकरित्या "कृष्णाचा शोध द्या, नाहीतर त्याचा एन्काउंटर होईल," असा दावा केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कृष्णा आंदेकर स्वतःहून समर्थ पोलिस ठाण्यात हजर झाला.