Shambhuraj Desai on Uddhav Thackeray : "काल मुंबईत इंडिया आघाडीची सभा झाली. प्रत्येकाला सभा घेण्याचा अधिकार आहे. मात्र, शिवतीर्थ हे बाळासाहेबांच्या भाषणांसाठी ओळखलं जायचं. उद्धवजी सभेला संबोधित करताना हिंदू बांधवांनो-भगिनींनो म्हणत करायचे. मात्र, काल तशी सुरुवात झाली नाही. बहुदा हा संगतीचा परिणाम असावा",अशी टीका मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. शंभूराज देसाई यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते. 


उद्धवजींना कालच्या सभेत दुय्यम स्थान दिलं 


शंभूराज देसाई म्हणाले, एरवी उद्धव साहेबांच्या भाषणानंतर सभा संपायची, मात्र काल राहुल गांधी असल्याने तसं झालं नाही. याहून पुढे उद्धवसाहेबांचं भाषण 5 मिनिटं झालं राहुलजींचं अधिक वेळ झालं. उद्धवजींना कालच्या सभेत दुय्यम स्थान दिलं असं मला वाटतं. काल तेजस्वी यादवही म्हणाले आम्हाला राहुलजींनी बोलावलं. मात्र त्यांनी  उद्धव ठाकरेंचा उल्लेख टाळला. काल मोठी रॅली झाली कुणी पाहिली? असा सवालही देसाई यांनी यावेळी बोलताना केला. 


जवानांनी जीवावर उदार होऊन तो पराक्रम केला


पुढे बोलताना देसाई म्हणाले, संजय राऊत म्हणतात देशाचा विकास काँग्रेसने केला. मग बाळासाहेब काँग्रेस सोबत का गेले नाहीत? त्यानी नेहमी काँग्रेसविरोधात भूमिका घेतली होती. मात्र संजय राऊत अशी भूमिका का घेत आहेत? मोदींनी काय केलं असे ते म्हणाले. मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केलं, त्यावर म्हणाले पाकिस्तानात जाऊन फटाके फोडले. हा जवानांचा अपमान आहे. जवानांनी जीवावर उदार होऊन तो पराक्रम केला, असेही देसाई यांनी नमूद केले. 


सभेला आलेल्या नेत्यांच्या चेहऱ्यांवर नैराश्य होतं


कालच्या सभेला गर्दी नव्हती. अनेक कोपरे रिकामी होते. सभेला आलेल्या नेत्यांच्या चेहऱ्यांवर नैराश्य होतं. मोदींच्या विरोधासाठी ही गर्दी होती. ED, CBI या स्वतंत्र यंत्रणा आहे. नाचता येईना अंगण वाकडं आहे. चांगल्या कामापासून विचलित करण्यासाठी  विरोधक वक्तव्य करतात. राहुल गांधी दिर्घकालानंतर मुंबईत आले, मात्र ते विकासावर काहीही बोलले नाहीत. पण उद्धव ठाकरे म्हणतात पक्ष माझा आहे. शिवसेना माझी वारसदार म्हणतात. तसेच आता रूद्राक्ष घालू लागले आहेत. हा बदल लोकांना कळायला हवा, असंही देसाई यांनी स्पष्ट केलं. 


शिवतारे यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली. ते आजारी असतानाही मी भेटलो. मुख्यमंत्र्यांनी युती धर्म पाळण्याच्या सूचना दिलेत. काही गैरसमज होते त्यावर चर्चा झाली. कोण कोणाच्या कर्माने मरेल हे आजच्या बैठकीत यावर शब्द भाष्य झालं नाही. बापूंचे आजचे बरेचसे गैरसमज दूर झालेले आहेत. शिवतारे बापूंनी पक्षाचा आदेश प्रमाण असं मुख्यमंत्र्यांच्या भेटीत सांगितलं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


मोठी बातमी : महाविकास आघाडीत ठाकरे गटाला 22 जागा मिळणार?, कुणाला कुठून उमेदवारी?