Sayaji Shinde, मुंबई : अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी आज (दि.11) मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत (NCP Ajit Pawar) प्रवेश केलाय. दरम्यान, पक्ष प्रवेश करताच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. सयाजी शिंदे पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी दिलेली आहे. दरम्यान, सयाजी शिंदे यांनी राजकारणात येण्यासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी कशामुळे निवडली? पुढची दिशा कशी असेल ? याबाबत भाष्य केलं आहे.
सिस्टीममध्ये जाऊन काम कराव लागेल - सयाजी शिंदे
सयाजी शिंदे म्हणाले, सिनेमात काम केलं आहे. नेते व्हीलन म्हणून काम केलं आहे. आता नव्या भूमिकेत आलो आहे. मला लक्षात आल की सिस्टीममध्ये जाऊन काम कराव लागेल म्हणून प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी 22 लाख बिया वाटल्या आहेत. आता काय हटायच नाही,जे व्हायच ते होऊ देत. त्यामुळे प्रवेश करत आहे. पाचशे सहाशे फिल्म केल्या आहेत त्यामुळे आता काही अडचण नाही. त्यामुळे राजकारणात येऊन काही मिळवायच नाही. चांगल काम करायचं आहे. त्यामुळे प्रवेश करत आहे.
माझा काही स्वार्थ नाही, मला राजकारणातून काही कमवायचं नाही
पुढे बोलताना सयाजी शिंदे म्हणाले, हातावर पोट असणाऱ्या लोकांना पाहातो. लाडकी बहीण योजनेतून लोकांना मिळणारे समाधान पाहतो. असं वाटतं की यांचे काही निर्णय चांगले होत आहेत. मी ठरवलं आता काय जायचं. आता काय हटायचं नाही. पक्षातील लोकांकडून मी चांगले धडे घेईल. चांगला अभ्यास करेन. विचार करेन. अजितदादांबद्दल मला नेहमीच आदर आहे. मला तुम्ही सन्मान दिला. मला फार आनंद वाटला. यापुढे जी माझ्या डोक्यात काम आहेत. ती व्हायला पाहिजे. पुढच्या पाच वर्षात नक्कीच होतील, असं मला वाटतं. बाकी माझा काही स्वार्थ नाही. मला राजकारणातून काही कमवायचं नाही. आयुष्यात सगळ करुन झालं आहे. पाचशे ते सहाशे सिनमे केले आहेत. माझ्याकडे पाहिल्यानंतर लोकांना आनंद होतं आहे. यापेक्षा जास्त काय पाहिजे, असंही सयाजी शिंदे यांनी स्पष्ट केलं.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Sayaji Shinde : मोठी बातमी : अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश!