मुंबई : गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा सिनेमातून राजकीय भूमिका करणारे आणि आपल्या अभिनायतून समाजावर, चाहत्यांच्या मनात घर करणारे अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji shinde) यांनी दे धक्का करत राजकीय पक्षात प्रवेश केला. विशेष म्हणजे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सयाजी शिंदेंच्या राष्ट्रवादी पक्षप्रवेशानंतर त्यांच्यावर समाजमाध्यमातून काही जणांकडून टीका करण्या येऊ लागली. विशेष म्हणजे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही सयाजी शिंदेंचा एक व्हिडिओ शेअर करत त्यांच्यावर टीका केली. तसेच, सयाजी शिंदेंनी गुलीगत धोका दिलाय, असेही त्यांनी म्हटलं होतं. आता, सुषमा अंधारेंच्या टीकेला सयाजी शिंदेंनी प्रत्युत्तर दिलंय. मी सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांना विचारून निर्णय घेत नाही. मला जे माझे निर्णय वाटले ते मी घेतले आहेत. त्यांना ते चुकीचं वाटलं तर त्यांना धन्यवाद, अशा शब्दात त्यांनी सुषमा अंधारेंवर पलटवार केलाय.


सयाजी शिंदेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला होता. मी सिनेमात काम केलं आहे. नेते व्हीलन म्हणून काम केलं आहे. आता नव्या भूमिकेत आलो आहे. मला लक्षात आल की  सिस्टीममध्ये जाऊन काम कराव लागेल म्हणून प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी 22 लाख बिया वाटल्या आहेत. आता काय हटायच नाही,जे व्हायच ते होऊ देत. त्यामुळे प्रवेश करत आहे. पाचशे सहाशे फिल्म केल्या आहेत, त्यामुळे आता काही अडचण नाही. त्यामुळे राजकारणात येऊन काही मिळवायच नाही. चांगल काम करायचं आहे, म्हणून राजकारणात प्रवेश करत आहे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर, या पक्षप्रवेशावर बोलताना सुषमा अंधारे यांनी म्हंटले की, कायम खलनायक भूमीका करणारे सयाजी शिंदे आमच्यासाठी नायक होते. मात्र, आता खलनायकी विचारधारेसोबत गेले, त्यांनी गुलिगत धोका दिला, असे म्हणत सुषमा अंधारेंनी टीका केल होती. तसेच, सयाजी शिंदेंचा एक जुना व्हिडिओदेखील शेअर केला होता. त्यावर, आता सयाजी शिंदेंनी पलटवार केलाय. 


काय म्हणाले सयाजी शिंदे


मी सुषमा अंधारे यांना विचारून निर्णय घेत नाही. मला जे माझे निर्णय वाटले ते मी घेतले आहेत. त्यांना ते चुकीचं वाटलं तर त्यांना धन्यवाद, अशा शब्दात सयाजी शिंदेंनी सुषमा अंधारेंच्या टीकेवर पलटवार केलाय. सध्या खूप जण प्रतिक्रिया देत आहेत, आता या सगळ्यांवर मी प्रतिक्रिया द्यायला हवी असं काही नाही. मला जी भूमिका पटली ती मी घेतली आता काही जणांना ती खलनायकी वाटत असेल त्याकडे मी लक्ष देणार नाही. यात न पडलेलं बरं, वयाची पासष्टी आली आहे. आतापर्यंतचे माझे निर्णय मीच घेतलेले आहेत, मी घेतलेला निर्णय योग्य आहे हे तुम्हा सर्वांना लवकरच कळेल, असेही सयाजी शिंदे यांनी म्हटले. 


राष्ट्रवादी प्रवेशानंतर काय म्हणाले होते सयाजी शिंदे


हातावर पोट असणाऱ्या लोकांना पाहातो. लाडकी बहीण योजनेतून लोकांना मिळणारे समाधान पाहतो. असं वाटतं की यांचे काही निर्णय चांगले होत आहेत. मी ठरवलं आता काय जायचं. आता काय हटायचं नाही. पक्षातील लोकांकडून मी चांगले धडे घेईल. चांगला अभ्यास करेन. विचार करेन. अजितदादांबद्दल मला नेहमीच आदर आहे.


हेही वाचा


जातीवर स्वार होणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहायचं नाही; भगवानगडावरुन पंकजा मुंडेंचा टोला