Winter Session: मंत्रिमंडळ विस्तारानंतर सुरू झालेल्या राज्यातील हिवाळी अधिवेशनात बीडमधील मसाजोग गावच्या हत्या प्रकरणाने मोठा गदारोळ उडाला. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने आमदारांनी सभागृह दणाणून सोडलं होतं. गेवराईचे राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित यांनी संतोष देशमुख यांचे पोस्टमार्टम केलेल्या डॉक्टरांशी संपर्क साधल्याचा सांगत संतोष देशमुख यांच्या शरीराच्या प्रत्येक अवयवावर इतकी मारहाण झाली होती की बरगड्या किडनी आणि लिव्हर या सगळ्या अवयवांचा चेंदामेंदा झाल्याचं त्यांनी सभागृहात सांगितलं. आरोपींना फाशी देण्याची मागणीही त्यांनी केली. 


या प्रकरणांमध्ये केज पोलिसांचा हलगर्जीपणा दिसून येतो. केस पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे आणि हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवला पाहिजे. ज्यांनी चूक केली आहे त्या आरोपींना अटक होण्यासाठी निर्देश द्या असं विजयसिंह पंडित म्हणाले. दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर पोस्टमार्टम रिपोर्टमुळे राज्यभर खळबळ उडाली होती. हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा चांगलाच लावून धरल्याचं दिसलं. 


काय म्हणाले विजयसिंह पंडित? 


नागपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी आमदारांनी आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली. गेवराईचे राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित यांनी सरपंच संतोष देशमुख यांचे पोस्टमार्टम केलेला डॉक्टरांशी संपर्क साधण्याचा सांगत देशमुख यांच्या प्रत्येक अवयवावर इतका मार लागला होता की पूर्ण अवयवांचा चिंतामिंद झाल्याचं त्यांनी सभागृहात सांगितलं. ते म्हणाले, गावामध्ये गेल्यावर तिथून पोस्टमार्टम केलेला डॉक्टरांना मी फोन केला होता त्यावेळी त्यांनी दिलेल्या माहितीनुसार बरगड्या किडनी आणि लिव्हर या सगळ्या अवयवांना मार लागला होता. इतक्या निघून पणे संतोष देशमुख यांची हत्या केली गेल्याचं त्यांनी सभागृहाला सांगत घटनेतील आरोपींना फाशी सारखी शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली.


संतोष देशमुखच्या पोस्टमार्टेमध्ये नेमकं काय म्हटलंय?


संतोष देशमुख यांना जबर मारहाण करण्यात आली. त्यांच्या अंगावर विविध ठिकाणी मुका मार दिल्याने अतिरक्तस्राव झाला आहे. त्यामुळे ते शॉकमध्ये गेल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, अहवालात संतोष देशमुख यांच्या मृत्यूचे कारण 'हॅमरेज अॅण्ड शॉक ड्यू टू मल्टिपल इन्जुरिज' असे नमूद करण्यात आले आहे. देशमुख यांच्या छाती, हात-पाय, चेहरा, डोके या भागात मारहाण करण्यात आली आहे. त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्याचा भाग मारहाणीमुळे काळा-निळा पडला होता. त्यामुळे मारेकऱ्यांनी संतोष देशमुख यांचे डोळे जाळून टाकल्याची चर्चा आहे. 


हेही वाचा:


Santosh Deshmukh PM Report: संतोष देशमुखांचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर, चेहरा काळानिळा पडला, डोळेही जाळले