Sanjay Raut: 'सत्ता टिकवण्यासाठी ही लाचारी आहे . ED, CBI पासून वाचण्यासाठी हे सगळे तिथे गेलेत .शिवसेना हा स्वतंत्र पक्ष आहे . आमचा कारभार स्वतंत्र होता .प्रखर राष्ट्रवादी हेच आमचे हिंदुत्व .तुम्ही स्वतंत्र राहिले नाहीत .तुमच्यावर कोणाचातरी नियंत्रण आहे हे तुम्ही घ्यायला गेलेल्या बौद्धिकतेवरून दिसून येतं . Rss अनेक संस्था निर्माण केल्या .आम्हाला एवढी भीक लागली नाही की आम्ही दुसऱ्याकडून बौद्धिक घ्यावी .असं म्हणत संघ आणि संघ परिवार यांच्याशी माझे नाते लहानपणापासूनच असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटल्यानंतर संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली आहे .गृहमंत्री अमित शहा यांच्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या वक्तव्यावरही त्यांनी हल्लाबोल केलाय .मालक तुम्ही उद्धव ठाकरे यांना फोन का केला असा सवाल शिंदे यांनी फडणवीस यांना विचारावा असाही खोचक टोला राऊतांनी लगावला .
संघ आणि संघ परिवार यांच्याशी माझे नाते लहानपणापासूनचे असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे .संघाच्या शाखेमधूनच माझी सुरुवात झाली .त्यानंतर शिवसेनेच्या शाखेत मी दाखल झालो आणि बाळासाहेब आणि दिघे साहेबांचा विचारांची जोडलो गेलो .या वक्तव्यावर उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावलाय .
काय म्हणाले संजय राऊत?
एकनाथ शिंदे काय म्हणतात तो त्यांचा प्रश्न आहे. पण हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं संघाबाबत असं विधान कधीच नव्हतं. बाळासाहेबांना अनेक वेळा दसरा मेळाव्यासाठी बोलावलं होतं, मात्र ते कधीच त्या मार्गाने गेले नाहीत,” असे राऊत म्हणाले. त्यांनी सांगितले, “राष्ट्रीयत्व हेच आमचं हिंदुत्व आहे. दुसऱ्या कोणत्याही संघटनेच्या कार्यालयात जाऊन बौद्धिक घेणे बाळासाहेबांना मान्य नव्हतं. सत्ता टिकवण्यासाठी ही लाचारी आहे. ईडी आणि सीबीआयपासून वाचण्यासाठी हे सगळे तिथे गेले आहेत. “हे शोधावं लागेल की शिंदे कधी शिवसैनिक झाले,” असे म्हणत राऊतांनी शिंदेंना टोला लगावला. “स्वतःला स्वयंसेवक म्हणवणाऱ्या शिंदेंनी बाळासाहेबांच्या विचारांपासून फारकत घेतली आहे,” अशी टीका त्यांनी केली. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर एकनाथ शिंदेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना राऊत म्हणाले, “उद्धव ठाकरे हे देशातील महत्त्वाचे नेते आहेत. ते फडणवीस यांना शुभेच्छा देण्यासाठी भेटले. शिंदेंनी यावर टीका करण्याऐवजी फडणवीस यांना विचारावे की त्यांनी उद्धव ठाकरे यांना फोन का केला. मालक तुम्ही उद्धव ठाकरे यांना का संपर्क केला यावर त्यांनी प्रश्न विचारावा.” असंही ते म्हणाले. गृहमंत्री अमित शहांच्या वक्तव्यावरही संजय राऊतांनी जोरदार टीका केली. आम्ही संसदेत उपस्थित होतो. आपण कोणत्या मजोरद्याने आणि आविर्भावात विधान केले हे देशाने पाहिलं. आमच्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देवच आहेत.