हिंगोली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची जर एक सभा झाली तर हिंगोली लोकसभेला (Hingoli Lok Sabha Election) चार चाँद लागल्याशिवाय राहणार नाही. मागच्या वेळेस हिंगोली लोकसभेची सीट पावणेतीन लाखाने निवडून आली होती. नरेंद्र मोदींची सभा झाली तर चार लाखाच्या वर मताधिक्यांनी हेमंत पाटील निवडून येतील असा विश्वास हिंगोलीचे आमदार संतोष बांगर (Santosh Banger) यांनी व्यक्त केला. शिवेसेना शिंदे गटाने हेमंत पाटील यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर ते निवडून येतील असंही संतोष बांगर म्हणाले.
पक्षाकडे आमची मागणी आहे की हिंगोलीत नरेंद्र भाई मोदी आणि योगी आदित्यनाथ यांची प्रचार सभा व्हावी असं संतोष बांगर म्हणाले. हिंगोली लोकसभेचा मतदार नरेंद्र मोदी यांच्याकडे बघतोय, महायुतीचे सर्व पदाधिकारी बैठक घेणार आहोत. येणाऱ्या दोन किंवा तीन तारखेला मोठ्या शक्तीने आम्ही उमेदवारी अर्ज भरणार आहोत अशी माहितीही त्यांनी दिली.
नागेश पाटलांच्या उमेदवारीमुळे आमचा विजय नक्की
आमदार संतोष बांगर म्हणाले की, ज्या दिवशी ठाकरे गटाकडून नागेश पाटील आष्टीकर यांची उमेदवारी फायनल झाली त्याच दिवशी आमचा विजय घोषित झालेला आहे. जो आता उमेदवार दिलेला आहे तो उमेदवार मागील विधानसभेला चार नंबर वर गेला होता. त्यामुळे लोकांना माहित आहे त्या उमेदवाराची काय परिस्थिती आहे. पाच वर्षांमध्ये काय केलं, काय नाही या लोकसभेतील जनता सुजाण आहे. त्यामुळे जनतेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र यापेक्षा कुठलाही विचार हिंगोलीतील मतदार करणार नाहीत.
काय म्हणाले संतोष बांगर?
हेमंत पाटील ज्यावेळेस खऱ्या शिवसेनेत आले तेव्हा अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी शब्द दिला होता की या हिंगोली लोकसभेची जागा खासदार हेमंतभाऊ पाटील यांनाच भेटणार आहे. कामाच्या जोरावरती हेमंत पाटील यांनी हिंगोली लोकसभेमध्ये अनेक उपक्रम आणले आहेत. हळद संशोधन केंद्र, हिंगोली मुंबई ट्रेन यासह अनेक बेरोजगारांना रोजगार देण्याचे काम हेमंत भाऊ पाटील यांनी केलं आहे. संशोधन केंद्रामध्ये जिल्ह्यातील चार ते पाच हजार लोक कामाला लागतील. असा हक्काचा खासदार या आधी झाला नाही, यापुढेही होणार नाही असा तडफदार खासदार आम्हाला लाभला आहे.
खासदार हेमंत भाऊ पाटील हे निवडून आले पाहिजे ही माझ्या सर्व शिवसैनिकांची जबाबदारी, महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे असं सांगत खासदार हेमंत पाटील मोठ्या मताधिक्यांनी निवडून येणार आहेत असं संतोष बांगर म्हणाले. आज फटाके फोडले, हाच विजयाचा आनंद आहे आज जे फटाके फुटले तर तेच फटाके चार जूनला तुम्ही दाखवू शकता असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आपापला पक्ष वाढवण्यासाठी सगळेच प्रयत्न करत असतात, जागाही मागत असतात. सोशल मीडियावर जे चाललंय ते मला वाटतं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते करत नाहीत, विरोधी पक्षाचे फेक अकाउंट करतायेत असा आरोप संतोष बांगर यांनी केला.
ही बातमी वाचा: