बारामती लोकसभा (Baramati Loksabha Election) मतदारसंघात नणंद आणि भावजय यांच्यात लढत होणार आहे. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे बारामतीत काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. याचदरम्यान अजित पवार आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात जुंपल्याची पाहायला मिळत आहे. 


तुम्ही पहिल्यापासून पवारांच्या मागे उभे राहिलात. नेहमी पवारांच्या लेकीला निवडून दिलं. यावेळी सुनेला निवडून द्या. जिथं पवार आडनाव असेल तिथे मतदान करायचं, असं विधान अजित पवारांनी केलं होतं. यावर बारामतीकरांनी पवारांच्या पाठिशी उभं राहायला हवं. यात चूक काय आहे? दोन गोष्टी असतात, एक मूळ पवार आणि दुसरे बाहेरून आलेले पवार, असं प्रत्युत्तर शरद पवार यांनी दिलं होतं. शरद पवार यांच्या या वक्तव्यावरुन अजित पवार गटातील महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. 


शरद पवारांच्या या विधानावर सुनेत्रा पवार यांना विचारल्यावर त्यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. अजित पवारांच्या विधानावर शरद पवारांनी बाहेरुन आलेले पवार आणि मूळ पवार, या दोन गोष्टी असतात, अशी प्रतिक्रिया दिली. तुम्हाला यावर काय बोलायचं आहे, असं सुनेत्रा पवार यांना विचारण्यात आले. यावर सुनेत्रा पवार यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. तसेच यावेळी हे ऐकून त्यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. 






काय म्हणाले होते अजित पवार? 


बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेत अजित पवारांनी बारामतीकरांना आवाहन केलं होतं. ते म्हणाले होते की, बारामतीकरांनी आतापर्यंत पवारांनाच मतदान केलं होतं. यावेळीही तेच करायचं आहे. आतापर्यंत वडिलांना म्हणजे पवारसाहेबांना, मुलाला म्हणजे मला, मुलीला म्हणजे सुप्रिया सुळेंना मतदान केलं. आता सुनेला मतदान करायचं आहे. ज्या ठिकाणी पवार हे नाव दिसेल त्या ठिकाणी मतदान करायचं, म्हणजे तुम्हाला पवारांनाच मतदान केल्याचं समाधान मिळेल असं अजित पवारांनी म्हटलं होतं. 


शरद पवारांचं प्रत्युत्तर 


पवारांनाच मतदान करा हे अजित पवारांचं मत योग्य आहे, पण मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार हे वेगवेगळे आहेत, असा टोला शरद पवारांनी अजित पवारांना लगावला होता. 


काय म्हणाल्या अंजली दमानिया?


शरद पवार यांचं जे विधान आलं की मूळ पवार आणि बाहेरुन आलेला पवार. यात शरद पवार यांना नेमकं काय म्हणायचं आहे? एखादी सून 30 वर्षे, 40 वर्षे, 50 वर्षे जरी लग्न होऊन झाले असतील तरीही ती बाहेरची असते का? ती घरची होत नाही. त्यांचं हे बोलणं मला मुळीच पटलेलं नाही, असं समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या.


संबंधित बातमी:


Sharad Pawar : सुप्रिया सुळेंसाठी शरद पवारांची डिप्लोमसी? कट्टर प्रतिस्पर्धींच्या भेटींचा सिलसिला सुरुच!