मुंबई : शिखर बँक घोटाळा (Shikhar Bank Scam) प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या चिंतेत वाढ झाली. या प्रकरणी अजित पवारांना ईओडब्ल्यूनं दिलेल्या क्लीन चिटला ईडीकडून आव्हान देण्यात आले आहे. यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिखर बँक घोटाळ्यात क्लीनचीट मिळणं हाच एक घोटाळा असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे.ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. तसेच खटला चालवताना जो खर्च झाला तो कोणाच्या खिशातून घेणार? असा सवाल देखील राऊतांनी यावेळी उपस्थित केला आहे.


संजय राऊत म्हणाले, शिखर बँक संदर्भात क्लीन चीट मिळणं हाच एक सगळ्यात मोठा घोटाळा आहे. अशापद्धतीने हजारो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप करत खटले चालवायचे,   त्यासाठी  लाखो कोट्यवधी रुपये सरकारच्या खात्यातून पैसे काढून खटले चालवायचे आणि मग त्या आरोपीने  पक्षात आला की त्याच्याबद्दल पुन्हा चांगले बोलायचे.  खटला चालवताना जो काही खर्च होतो तो कोणाच्या खिशातून  घेणार आहे. या खटल्यांचा  नरेंद्र मोदी यांच्याकडून घेणार का?


काँग्रेस फुटीर आमदारांवर नक्की  कारवाई करेल : संजय राऊत


विधान परिषदेतील काँग्रेसच्या क्रॉस वोटिंगवर संजय राऊत म्हणाले,  क्रॉस व्होटिंग झालं आहे हे काँग्रेसने मान्य केले आहे.  आम्हालाही तो अनुभव आला आहे. त्यांना फार मोठ्या रकमा आणि जमिनीचे तुकडे  दिले. मतदानाला जाण्यापूर्वीच त्यांना हे देणार असल्याचे मंजूर केले होते , ही एक प्रकारची संविधान हत्या आहे.  
अशा पद्धतीने आमदारांना पैसे देऊन मत फोडणे ही संविधानाची हत्या नाही का?  सरकार बेकायदेशीर आहे आमदार अपात्र करू शकतात त्याच पद्धतीच्या आमदारांना अशा पद्धतीने फोडणे चुकीचे आहे. म्हणून अमित शहा आणि नरेंद्र मोदी हेच खरे संविधानाची हत्या करत आहे याच काँग्रेसचे आमदार आणि चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव घडवून आणला. काँग्रेस पक्षाकडून नक्कीच आमदारांना कारवाई होईल कारण काँग्रेसचे काम करण्याची एक पद्धत आहे त्यानुसार ते कारवाई करतील.


चंद्रबाबूंच्या वर्षा बंगल्यावरील भेटीवर संजय राऊत म्हणाले...


चंद्राबाबूंच्या वर्षा बंगल्यावरील भेटीवर संजय राऊत म्हणाले,  चंद्राबाबू आणि महाराष्ट्राचे काय समीकरण आहे. ही एक शिष्टाचार भेट असते . वर्षा बंगल्यावर दुसरा कोणी असतं तरी महाराष्ट्रात आलेले दुसऱ्या राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना भेटतात. इंडिया आघाडीचे मुख्यमंत्री काय वर्षावर जाणार नाहीत. हुरळून जाण्यासारखे काही नाही. 


मोदींचे सरकार कधीही कोसळेल : संजय राऊत


लोकसभा निकालानंतर पेढे वाटण्यावर संजय राऊत म्हणाले,  2024 मोदी जिंकले म्हणून पेढे वाटतात , नाचत आहेत त्यांनी आपले मानसिक स्वास्थ ठीक आहे का याची तपासणी करणे गरजेचे आहे.नरेंद्र मोदी यांचा पराभव झालेला आहे. मोदींकडे बहुमत नाही. कुबड्यावरच सरकार  आहे. चंद्राबाबू नायडू आणि नितेश कुमार यांना देवाने सुबुद्धी दिली तर त्यांचे  सरकार कधीही कोसळेल. जे म्हणतात मोदी जिंकले त्यांच्या बडबडण्यावर मोदी बहुमत सिद्ध करू शकणार नाहीत.


Video:विधानपरिषदेवरून फडणवीसांचा घेतला समाचार 



हे ही वाचा :


Maharashtra Politics : महाविकास आघाडी अन् महायुतीच्या पॅटर्नमध्ये शिंदे-काँग्रेस सर्वाधिक लाभार्थी! ठाकरे -भाजपच्या पदरात काय पडलं?