मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारने नाशिक मनपा भूसंपादनाचा तब्बल 800 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. दोन दिवसात मी घोटाळ्याचे पुरावे सादर करत मोठा स्फोट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार हल्लबोल केला. स्वतः शेण खायचं अन् दुसऱ्याच्या तोंडाला वास घ्यायचा, फडणवीस साहेबांचं साधारण हेच धोरण दिसत आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका केली.  


मुख्यमंत्र्यांनी एका मुलाखतीत म्हटलं की, उद्धव ठाकरेंनी आपलं मुख्यमंत्रीपद वाचविण्यासाठी भाजपचे 25 आमदार फोडण्याचा कट रचला होता, असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला होता. त्यावर, यामध्ये कुठलंही तथ्य नाही. तुम्ही आमचे 40 आमदार का फोडले ते सांगा त्याच्यावर का बोलत नाहीत. तुम्ही शरद पवारांचे चाळीस आमदार फोडले, आमचे 40 आमदार फोडले. स्वतः शेण खायचं अन् दुसऱ्याच्या तोंडाला वास घ्यायचा, फडणवीस साहेबांचं साधारण हेच धोरण दिसत आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला. स्वतः शेण खा.. खा... खायचं, शेणात तोंड बुडवायचं आणि दुसऱ्याच्या तोंडाला वास घ्यायचा हे त्यांचे धोरण आहे, असे म्हणत राऊत यांनी शिंदे फडणवीसांवर जोरदार टीका केली. 


800 कोटींची भूसंपादन घोटाळा


नाशिक महानगरपालिका हद्दीत नगर विकास खातेअंतर्गत भूसंपादन घोटाळा करण्यात आला आहे. नाशिकमधल्या आपल्या मर्जीतल्या बिल्डरांना भूसंपादनाच्या नावाखाली आठशे कोटी रुपयांची कशी खैरात केली. हे 800 कोटी रुपये बिल्डरांच्या माध्यमातून कोणाला गेले यासंदर्भात माझं काम चालू आहे, पुढील दोन दिवसांत याच उलगडा पुराव्यासह करणार असल्याचंही राऊत यांनी म्हटले. भूसंपादन घोटळ्याप्रकरणी मी रीतसर तक्रार करत आहे, नगर विकास खातं मुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखाली आहे. मग, ते ठाकरे सरकारमध्ये असताना किंवा आतादेखील सर्व महानगरपालिका क्षेत्रामध्ये अशाप्रकारे घोटाळे होत आहेत. हा जो पैसा राजकारणामध्ये येत आहेत सध्या महाराष्ट्रात तो कोणत्या माध्यमातून येत आहे, त्याचा खुलासा आम्ही करणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.  


नगरविकास खात तेव्हाही शिंदेंकडेच


विशेषतः नाशिक महानगरपालिका एका नाशिक महानगरपालिकेमध्ये एका व्यवहारात भूसंपादनात 800 कोटी रुपये गैर मार्गाने गोळा केले, हा जनतेचा पैसा आहे. हा पैसा मग शिवसेना फडणवीस गट यांच्याकडे कसा पोहोचत आहे हे मी दोन दिवसात तुमच्याकडे पुराव्यासहीत देणार असल्याचंही राऊत यांनी म्हटलं. नगर विकास खात्याचा घोटाळा झाला, सरकार कोणाचाही असेल पण नगर विकास मंत्री तेच होते आणि आजही तेच आहेत, असे म्हणत राऊत यांनी थेट एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला.  


17 ते 18 बिल्डर्संना लाभ देण्याचा प्रयत्न


साधारण 17 ते 18 महत्त्वाचे बिल्डर आहेत ते शिवसेना फडणवीस गटाशी संबंधित आहेत त्यांना हा लाभ मिळावा म्हणून ह्या भूसंपादनाचा रेटा लावला,  या भूसंपादनाचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत, तर बिल्डरांना मिळाले. हे सगळे बिल्डर मिंदे आणि कंपनीचे खास हस्तक आहेत. समृद्धी  महामार्गामध्ये देखील तेच झाले आहे, आणि याठिकाणी भूसंपादनाच्या बाबतीत हेच होत आहे. मी फक्त सध्या नाशिक महानगरपालिकेतल्या भूसंपादनाचा एक प्रकरण देणार आहे, त्यानंतर या राज्यामध्ये काय चाललं आहे ते तुम्हाला कळेल. पुराव्यासह इकडेच फाईल ठेवले जाईल ते तुम्ही चेक करू शकता, असे म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे व फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत.  


ऑन गुजराती कंपनी


मुंबईमध्ये एका गुजराती कंपनीने मराठी लोकांनी अर्ज करू नये मराठी माणसाने महाराष्ट्रामध्ये अर्ज करू नये अशा प्रकारची भूमिका घेतली. त्यावरवरुनही संजय राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केला. या महाराष्ट्रातल्या सरकारचे मुख्यमंत्री आणि जे म्हणतात आमचे शिवसेना खरी. पण, ही शिवसेना मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन झाली जी शिवसेना मोदी शाहांनी तोडली ती याच कारणासाठी. महाराष्ट्रात मराठी माणसाचा आवाज राहू न देण्याचं काम केलं जात आहे, असा आरोपही राऊत यांनी केला. बुळचट शिवसेना, शिवसेना फडणवीस गट त्याला मी बुळचट शिवसेना बोलतो, या विषयावर ते गप्प आहेत, हिम्मत असेल तर आवाज द्या नाहीतर आम्ही बघतो काय करायचं ते असेही राऊत यांनी म्हटलं.  


ऑन घाटकोपर मराठी गुजराती इश्शू


काल घाटकोपर मधल्या एका सोसायटीमध्ये गुजराती राहतात. पण, तिथे मराठी आहे म्हणून शिवसैनिकांना रोखलं. बुळचट शिवसेना काय करते हे गांडू आहेत ना, शिवसेना फडणवीस गट ही गांडूंची सेना आहे. आमची शिवसेना खरी म्हणणारे बुळचट काय बोलतात ह्यावर ते स्पष्ट व्हायला पाहिजे, असे  


ऑन विजय करंजकर


राजाभाऊ वाजे हे दोन लाखाच्या फरकाने निवडून येत आहेत. काही लोक गेले असतील जात असतात, 4 जून नंतर त्यांना पश्चाताप होईल. विजय करंजकर हे आमचे जुने जाणते अनुभवी पदाधिकारी आहेत. खरं म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्ही त्यांचं नाव राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत पाठवलं होतं, तेही त्यांना न विचारता. जुना शिवसैनिक आहे तेव्हा त्यांनी माझं नाव का पाठवता माझ्यापेक्षा इतर जेष्ठ लोक आहेत, असेही म्हटले होते.