Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचा बेडरूममधील पैशांनी भरलेल्या बॅग एक व्हिडिओ व्हायरल समोर आणला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संजय शिरसाट यांनी तो व्हिडिओ मोर्फ केलेला असल्याचे म्हटले. तसेच संजय राऊत यांच्या विरोधात अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा देखील संजय शिरसाट यांनी दिला आहे. यानंतर संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गटाच्या चार नेत्यांची नावे घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे मोठी मागणी केली आहे.
संजय राऊत म्हणाले की,व्हिडिओ मॉर्फ केला आहे की काय केलं हे फॉरेन्सिक लॅब ठरवेल. तो व्हिडिओ काय आम्ही काढलेला आहे का? ओरिजनल पण आहे आणि व्हायरल सुद्धा आहे. त्यावर आता चर्चा करण्यापेक्षा मी मुख्यमंत्री फडणवीस यांना आवाहन करेल की, शिंदे गटाचे जे भ्रष्ट मंत्री आहेत, संजय राठोड यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप भाजपचे नेते परिणय फुके यांनीच केलेला आहे. संदिपान भुमरे यांनी दीडशे कोटीची जमीन ड्रायव्हरच्या नावावर केली. मला पण त्यांचे ड्रायव्हर व्हायला आवडेल, असे अनेक लोक मला सांगत आहेत. संजय शिरसाट, उदय सामंत अशा मंत्र्यांचे जे घोटाळे समोर आले आहेत, त्यांची एकत्रित एसआयटी स्थापन केली पाहिजे. एक मोठी न्यायालयीन चौकशी शिंदे गटाच्या मंत्र्यांची केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
राज-उद्धव ठाकरेंच्या युतीवर काय म्हणाले संजय राऊत?
दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या एकत्रिकरणावर भाष्य केले आहे. या विषयावर आता चर्चा फार झाली आणि होत आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे एकत्र येतील का आणि पुढे काय करतील? मला वाटतं की, महानगरपालिका निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाहीत. त्या जाहीर होऊ द्या. लोकांच्या इच्छा आहेत, लोकांच्या भावना आहेत आणि लोकांचा रेटा आहे. स्वतः राज ठाकरे यांनी सांगितलंय की, बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकारतो. उद्धव ठाकरे देखील म्हणाले आहेत की, लोकांच्या मनात जे आहे ते होईल आणि तुमच्याही मनात जे आहे ते होईल. त्यामुळे फार चर्चा न करता योग्यवेळी योग्य निर्णय होतील, असे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा