Sanjay Raut मुंबई: देशभरात छावा चित्रपटामध्ये औरंगजेब किती क्रूर होता हे दाखवलं जातंय. त्यातही संभाजी महाराजांचे हुतात्म्या किती मोठं होतं हे आपण साऱ्यांनी पाहिलंय. अगदी त्याच पद्धतीचा क्रूरपणा सरपंच संतोष देशमुख हत्या  (Santosh Deshmukh case) प्रकरणात झाला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात एका नागरिकाचा क्रूरपणे मृत्यू झाला असून या हत्येचा खेळ राजकारण्यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत. त्यांनी पुढच्या 24 तासांमध्ये धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा राजीनामा घेतला पाहिजे होता. ते म्हणतात कोर्ट ठरवेल. मात्र कोर्ट ते नंतर ठरवेल. आता प्रथमदर्शनी एवढे पुरावे समोर असताना जर नैतिकतेच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा घेतला असता तर त्यांनी न्याय केला असं आम्हाला छातीठोक पणे म्हणता आलं असतं. आज लोकांचा दबाव आहे. हे फोटो, व्हिडीओ पाहून तुमची मान खाली गेली आहे. त्यानंतर उपरती झाली असेल, अशी घणाघाती टीका करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेवर भाष्य केलंय.


मुख्यमंत्री काही लोकांना ते वाचवण्याचा प्रयत्न करताय- संजय राऊत


सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अद्यापही जनतेने संयम पाळलेला आहे. या राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे रामशास्त्री नाहीत, हे लक्ष्यात आलंय. मुख्यमंत्री आपल्या लोकांच्या बाबतीत राज्यात कायदा आणि न्याय राखत नाहीत. काही लोकांना ते वाचवण्याचा प्रयत्न करतात, त्याला  न्याय म्हणत नाही. देवेंद्र फडणवीस यांना जर न्याय करायचा असेल तर कलंकित मंत्र्यांना त्यांनी मंत्रिमंडळातून बाहेर काढलं पाहिजे, त्यांना घरचा रस्ता दाखवला पाहिजे.  तसेच जे मंत्री भ्रष्टाचारी आहेत त्यांना बडतर्फ केलं पाहिजे. किंबहुना राज्यात कायद्याचा गैरवापर कुणी करू नये हे देखील पहिले पाहिजे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कायद्याचा गैरवापर होत असताना त्यांना टोचणी लागायला पाहिजे. असेही खासदार संजय राऊत म्हणाले. 


आमदार सुरेश धस नेमके थंडे का पडले?


वाल्मिक कराडला धनंजय मुंडे वाचवतील आणि धनंजय मुंडेंना वाल्मिक कराड वाचवतील. ही मोठी साखळी आहे. हे आका प्रकरण नेमकं काय आहे? भाजप आमदार सुरेश धस नेमके थंडे का पडले? आमच्या सुरेश धस यांचा कोणी गळा दाबला?  पण तुमचे राजकीय अकादरी तुमच्या मानेवर बसले तरी जनता ही तुमच्या छाताडावर नक्कीच बसेल. हत्येतील फोटो  मन अस्वस्थ करणारे आहेत.  हे सर्व फोटो व्हिडिओ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार सह राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनीही पाहिले आहेत.  तपास अधिकाऱ्यांनी ते समोर आणले आहेत.  असे असताना मुख्यमंत्री असं काही घडलं नसल्याचे म्हणत असतील तर ते जनतेची दिशाभूल करत असल्याचा घनाघातही खासदार संजय राऊत यांनी केलाय. हे छायाचित्र आमच्यापर्यंत आले आहेत तर राज्याचे गृहमंत्री हे कसं काय नाकारू शकतात. असेही ते म्हणाले.


हे ही वाचा 


Karuna Sharma on Santosh Deshmukh Case : ती लघवी संतोष देशमुखांच्या तोंडावर नाही, शासन प्रशासनाच्या कारभारावर : करुणा शर्मा