Sangamner Election 2025: विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव केल्यानंतर शिवसेनेचे आमदार अमोल खताळ (Amol Khatal) यांनी आपला मोर्चा संगमनेर नगरपालीकेकडे वळवला आहे. अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी सेवा समितीच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात असून त्यांच्या विरोधात अमोल खताळ यांच्या भावजयी निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे दोन युवा आमदारांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. विखे पाटलांच्या नेतृत्वात सेना भाजप महायुतीच्या माध्यमातून थोरातांच्या संगमनेर सेवा समीतीशी थेट लढाई होत आहे. सेना भाजप युतीच्या नगराध्यक्ष उमेदवार सुवर्ण खताळ यांच्यासाठी आमदार अमोल खताळ शहरातील नागरीकांच्या भेटीगाठी घेत असून विधानसभे प्रमाणे नगरपालीकेतही जनता सत्तापालट करणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

Continues below advertisement


Amol Khatal: वर्षभरापूर्वी विकासासाठी इथे परिवर्तन झालं, अपेक्षा पूर्ण करण्याची ग्वाही मी देतो


वर्षभरापूर्वी विकासासाठी इथे परिवर्तन झालं. अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेल्या कामांसाठी आम्ही मतदारांना आता साद घालतोय. केंद्रात राज्यात महायुतीचे सरकार असून नगर विकास खाते देखील शिवसेनेकडे आहे. या माध्यमातून शहराचा विकास होईल, अशी संगमनेरकरांना आशा आहे. ज्या अपेक्षण विधानसभेत मतदारांनी सत्ता परिवर्तन केला त्या अपेक्षा पूर्ण करण्याची ग्वाही मी देतो. अशी प्रतिक्रिया आमदार अमोल खताळ यांनी दिली.


Amol Khatal: जनतेने केवळ थोरात यांच्याच नव्हे तर थोरात-तांबेंच्या विरोधात मला निवडून दिलंय


तुम्ही व्यासपीठावर एक बोलता आणि खाली उतरल्यावर पडद्यामागे काय षडयंत्र करतात हे सगळ्यांना माहिती आहे. मामा भाच्याच्या टोळीबरोबर मला काम करायचं नाही. मला जनतेने केवळ थोरात यांच्याच नव्हे तर थोरात-तांबेंच्या विरोधात निवडून दिल आहे. विकास करण्यासाठी तुम्हाला चाळीस वर्षे लागले, मला तेवढा वेळ लागणार नाही. सत्यजित तांबे दावा करतात मी निधी आणला. मग यापूर्वी त्यांचे वडील देखील पदवीधरचे आमदार होते त्यावेळी कधी निधी का आणला नाही? हे केवळ जनतेची दिशाभूल करतात. महसूल मंत्री असताना हे केवळ वसूल मंत्री झाले होते.अशी टीका ही आमदार अमोल खताळ यांनी विधान परिषदेचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्यावर केली आहे.


Sangamner Election 2025: सत्यजित तांबे, अमोल खताळांची प्रतिष्ठा पणाला


Sangamner Election 2025: संगमनेर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत यंदा ‘नातेवाईक विरुद्ध नातेवाईक’ अशी अभूतपूर्व लढत रंगणार असून दोन वेगवेगळ्या राजकीय गटांच्या प्रतिष्ठेलाच थेट धक्का बसणार आहे. विधान परिषदेचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्या पत्नी मैथिली तांबे (Maithili Tambe) एका बाजूला, तर महायुतीचे आमदार अमोल खताळ (Amol Khatal) यांच्या भावजयी सुवर्णा खताळ (Suvarna Khatal) दुसऱ्या बाजूला रिंगणात उतरत असल्याने या दोन्ही आमदारांची राजकीय प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.


आणखी वाचा