अकलूज : माळशिरस विधानसभेला भाजप (BJP) उमेदवार राम सातपुते यांनी त्यांना आतून मदत करण्यासाठी 35 कोटी रुपयांची ऑफर आपल्याला दिली होती. अगदी मला घेऊन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडेही गेले होते. मात्र आपण एकदा दिलेला शब्द बदलत नाही हे मी सांगून आलो होतो. निवडणुकीला चार दिवस उरले असताना ही ऑफर 50 कोटी रुपयांपर्यंत गेली होती, असा गौप्यस्फोट जयसिंह मोहिते पाटील (Jaysingh Mohite Patil) यांनी अकलूज (Akluj) प्रचाराच्या सांगता सभेत केला. अकलूज येथील विजय चौकात ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत ही प्रचाराची विराट सांगता सभा झाली. यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) आमदार उत्तम जानकर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महबूब शेख आणि उभाठाचे जिल्हाध्यक्ष संभाजी राजे शिंदे उपस्थित होते.

Continues below advertisement

लोकसभा निवडणुकीच्या वेळी धैर्यशील मोहिते पाटील आणि उत्तम जानकर आपल्याकडे आले होते. यावेळी जानकर यांना निवडून आणण्याचा शब्द आपण दिला होता आणि तो पाळण्यासाठी आपण ती ऑफर धुडकावली, पण शब्द मोडला नाही. असे मोहिते पाटील यांनी सांगितले.

Jaisingh Mohite Patil : तू उभा राहू नकोस पडशील, असे स्पष्ट मी सांगितले होते

Continues below advertisement

राम सातपुते जेव्हा सोलापूर लोकसभेला उभा राहिला निघाला होता तेव्हा त्याला तू उभा राहू नकोस पडशील, असे स्पष्ट मी सांगितले होते. सोलापूर लोकसभा मतदारसंघात विजय दादांना मानणारे 80 हजारापेक्षा जास्त मतदार असल्याने तू दादांना दगा देऊन तिकडे गेल्यास, तुझा पराभव नक्की होईल. असे सांगूनही सातपुते यांनी ऐकले नसल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर पुन्हा माळशिरस मध्ये निवडणूक लढविण्यासाठी ते आले असता तू उभा राहू नकोस, पुन्हा पडशील असे त्याही वेळी सांगितले होते. गेल्या वेळी नुसत्या अकलूजकरांनी तुला 19 हजाराचे लीड मिळवून दिले आणि त्यावेळी जानकर यांचा फक्त 2600 मताने पराभव झाला. याची आठवण जयसिंह मोहिते पाटील यांनी करून दिली.

Akluj : नगराध्यक्षासह सर्व 26 उमेदवार मोठ्या मताधिक्याने जिंकणार

मोहिते पाटलांचे अकलूज करांवर आणि अकलूजकरांचे मोहिते पाटलांवर खूप प्रेम आहे. जेव्हा अकलूजकर अडचणीत असतात तेव्हा मोहिते पाटील धावून येतात आणि जेव्हा मोहिते पाटील अडचणीत असतात तेव्हा सर्व अकलूजकर बाजीप्रभू प्रमाणे समोर उभे राहतात अशा शब्दात त्यांनी अकलूजकरांशी असलेले नाते सांगितले. याही वेळी सर्व 26 नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष मोठ्या फरकाने विजयी होतील असा दावा जयसिंह मोहिते पाटील यांनी केला.

इतर महत्त्वाच्या बातम्या