Navneet Rana अकोट : विधानसभा निवडणुकीत भाजपनं राज्यात 'बटेंगे तो कटेगे'चा नारा दिला होता. यावर विरोधकांनी मोठी टिका करीत रान उठवलं होतं. मात्र, विरोधकांना लोकसभेत मुस्लिम मतांचं मिळालेलं दान समोर ठेवून हा मुद्दा विधानसभेत प्रतिष्ठेचा केला होता. राज्यात अनेक ठिकाणी भाजपनेही मुस्लिमांना उमेदवारी दिलेली असतांना नवनीत राणांनी परत अकोटच्या सभेत 'बटेंगे तो कटेगे'चा नारा दिलाय. त्यामुळे भाजप नगरपालिका निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पुन्हा 'बटेंगे तो कटेंगे' मुद्द्याला हवा देण्याचा प्रयत्न यातून करतेय का?, असा प्रश्न यातून निर्माण झालाय.

Continues below advertisement


दरम्यान, याच सभेत नवनीत राणांनी काँग्रेसनेते राहूल गांधींना (Rahul Gandhi) थेट चॅलेंज'च दिलंय (Navneet Rana on Rahul Gandhi) राहूल गांधींनी संविधानाचं पुस्तक हाती न घेता संविधानातील कलमं सांगून दाखवावी, असं त्या म्हणाल्यात. असं राहूल गांधींनी केलं तर आपण राजकारण सोडू असं आव्हान राणांनी (Navneet Rana)राहूल गांधींना दिलंय.


Navneet Rana : पुरुषांच्या तुलनेत महिला मतदार खूप इमानदार आणि एकनिष्ठ


दरम्यान, माजी खासदार नवनीत राणा यांनी पुरुषाबद्दल एक वादग्रस्त विधान केलंय. त्या अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये भाजपच्या प्रचारसभेत बोलत होत्या. नगरपरिषद निवडणुका सुरु आहे. आता खूप पार्ट्या, कार्यक्रम होणार आहे. पुरुष मतदार हा अनेक पार्ट्यांमध्ये जातो आणि रात्री 2 वाजता घरी परततो. मात्र, या तुलनेत महिला मतदार खूप इमानदार आणि एकनिष्ठ राहतात. कारण, बायका कधीही कुणाच्या पैशाला बळी पडत नाही आणि कधीही कुणाच्या पार्टीत न जाण्याची त्यांची भूमिका राहते. 'ती' चटणी भाकर खाणार, पण शेवटच्या श्वासापर्यंत घराला घर बनवणार, असं विधान नवनीत राणांनी केलंय. त्यामूळे पुरूष मतदारांना नवनीत राणांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय का? हा प्रश्न यातून निर्माण होतोय. दरम्यान, या वक्तव्याने आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता राजकीय वर्तुळात केली जात आहे.


Prakash Bharsakale : आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या आरोपांच्या गौप्यस्फोटाने खळबळ


अकोला जिल्ह्यातील अकोटचे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या एका गौप्यस्फोटामुळे मोठी खळबळ उडालीये. त्यांनी कोरोना काळात विरोधक आपल्या मरणाची वाट पाहत असल्याचा आरोप केलाय. आपल्या मरणाची वाट पाहणाऱ्या राजकीय आणि पक्षांतर्गत विरोधकांनाही त्यांनी चांगलं सुनावलंय. कोरोना काळात आपल्यावर अकोल्यात करण्यात आलेल्या उपचारावर त्यांनी शंका उपस्थित केलीय. उपचारादरम्यान आपलं अन्न बंद झालं होतं. या प्रकारात 'दाल में कुछ काला है', असा संशय आपल्या कुटुंबियांना आला होता, असं ते म्हणालेय.


काही लोकांना आपण कोरोनात मरावं असं वाटत होतं- प्रकाश भारसाकळे


काही लोकांना आपण कोरोनात मरावं असं वाटत होतंय. मात्र जनतेच्या आशीर्वादावरच आपण यातूनही बाहेर निघालो असल्याचं आमदार भारसाकळे म्हणालेय. पत्नी अकोल्यात योग्य उपचार होत नसल्यामुळे नागपूरला शिफ्ट होण्याचा सल्ला देत होती.‌ आपण जनतेच्या आशीर्वादामुळे येथेच चांगलं झाल्याचं भारसाकळे म्हणालेय. ते अकोट येथे भाजपच्या प्रचारसभेत बोलत होतेय. यावेळी अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणाही उपस्थित होत्या.


अकोला जिल्ह्यातील अकोटचे आमदार असलेले भारसाकळे हे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरचे रहिवासी आहे. विधानसभा निवडणुकीत भारसाकळे यांचं तिकीट कापलं जाणार, अशी चर्चा जिल्ह्यात होती. त्यांचं तिकीटही काहीसं उशिरा जाहीर झालंय. मात्र, मतदारसंघ महिला राखीव होईपर्यंत आपण अकोटची भूमी सोडणार नसल्याचं ते म्हणालोय. भारसाकळे यांच्या या वक्तव्यातून त्यांनी पुढच्या निवडणुकीतही आपणच अकोटमध्ये उमेदवार राहणार असल्याचा इशारा आपल्या राजकीय आणि पक्षांतर्गत विरोधकांना दिलाय.


इतर महत्त्वाच्या बातम्या