Sandipan Bhumre on Chandrakant Khaire, छत्रपती संभाजीनगर : "उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आदेश दिल्यास पश्चिममधून मी निवडणूक लढवणार, मला गद्दारांना पाडायचं आहे", असं म्हणत ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी शिदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्याविरोधात शड्डू ठोकला होता. दरम्यान, शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी चंद्रकांत खैरेंना (Chandrakant Khaire) आव्हान दिले आहे. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) बोलत होते. 


चंद्रकांत खैरेंची हौस अजून फिटलेली नाही, खैरेंना म्हणाव औरंगाबाद पश्चिममध्ये पहिल्यांदा उमेदवारी आण


संदिपान भुमरे म्हणाले, संजय शिरसाट यांच्यावर अन्याय झालेला नाही. शिंदे साहेब सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात. मला वाटतं शिरसाट साहेबांना देखील न्याय भेटेल. चंद्रकांत खैरेंची हौस अजून फिटलेली नाही. खैरेंना म्हणाव औरंगाबाद पश्चिममध्ये पहिल्यांदा उमेदवारी आण. पहिली उमेदवारी आणा म्हणाव नंतर आपण बघूयात. उमेदवारी आणा त्यात तुमची पहिली पात्रता आहे. उमेदवारी आणल्यावर तुम्हाला सांगू संजय शिरसाट काय आहे आणि तुम्ही कोण आहात, असं आव्हानही भुमरे यांनी दिलं. 


खैरेला मातोश्रीवर आता कोणीही विचारत नाही, त्यांना उमेदवारीही मिळणार नाही


चंद्रकांत खैरेंची हौस फिटू शकत नाही. त्यांनी आता फक्त नेतेगिरी करावी, त्यांनी निवडणुकीत उभा राहू नये, असा माझा त्यांना सल्ला आहे. खैरेला मातोश्रीवर आता कोणीही विचारत नाही. त्यांना उमेदवारीही मिळणार नाही. त्यांना मातोश्रीवरही कोण येऊ देत नाही. उभा राहिलेच तर डिपॉझिट जप्त करुन दाखवू. मतदारचं खैरेचं डिपॉझिट घालतील, असा विश्वासही संदिपान भुमरे यांनी व्यक्त केला. पुढे बोलताना संदीपान भुमरे म्हणाले, प्रत्येक वार्डात माझ्या सत्काराचा ओघ सुरु आहे.  मला वाटतं कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत घेतली, कार्यकर्त्यांनी केलेलं मतदान केलं, त्यांना वाटतं आपल्या नेत्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. त्यामुळे सत्काराचा ओघ सुरु आहे. 


चंद्रकांत खैरे काय म्हणाल होते ? 


औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात पहिला हिंदू आमदार मी झालो होतो. सध्या यांचा पैश्यांचा उन्मद सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत मला पैश्याने पाडण्यात आले. आता शरद पवार आणि काँग्रेसचा वलय आहे. त्यामुळे 140 जागा आम्ही लढवणार असल्याची तयारी आहे. तर आमची 103 जिंकणार असल्याची तयारी असल्याचा विश्वासही चंद्रकांत खैरे यांनी बोलताना व्यक्त केला होता.


इतर महत्वाच्या बातम्या 


Chandrakant Khaire : गद्दारांना पाडण्यासाठी मी विधानसभा लढणार, चंद्रकांत खैरे यांची घोषणा, विधानसभा मतदारसंघही ठरला!