Who Is C. Sadanandan Master: राष्ट्रपती कोट्यातून चार जणांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. उज्ज्वल निकम यांच्यासोबतच सी. सदानंदन मास्टर (C. Sadanandan Master), हर्षवर्धन श्रृंगला आणि डॉ. मीनाक्षी जैन यांनाही राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर संधी मिळाली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेचे नामांकित सदस्य म्हणून चार प्रतिष्ठित (The President of India Rajya Sabha Nomination) व्यक्तींची नियुक्ती केली आहे. भारतीय संविधानाच्या कलम 80(1)(a) अंतर्गत या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. राज्यसभेवर नियुक्त झालेल्या सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सी. सदानंदन मास्टर यांच्या संघर्षाची सध्या चर्चा आहे. 

Continues below advertisement

Continues below advertisement

कोण आहेत सी. सदानंदन मास्टर (Who Is C. Sadanandan Master)

सी. सदानंदन मास्टर केरळमधील एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ आहेत. ते राष्ट्रीय शिक्षक संघाचे केंद्रीय उपाध्यक्ष आणि 'नॅशनल टीचर्स न्यूज'चे संपादक देखील आहेत. 1994 मध्ये राजकीय हल्ल्यात दोन्ही पाय गमावले असले तरी, सी. सदानंदन मास्टर यांनी समाजसेवा आणि शिक्षणाला आपल्या जीवनाचे ध्येय बनवले. त्यांच्या नियुक्तीकडे सामाजिक सेवेतील योगदानाचे कौतुक म्हणून पाहिले जात आहे.

नेमकं काय घडलेलं?

25 जानेवारी 1994 रोजी, सदानंदन मास्टर, तेव्हा फक्त 30 वर्षांचे होते, कन्नूर जिल्ह्यातील त्यांच्या घराजवळ झालेल्या राजकीय हल्ल्यात गंभीर जखमी झाले. त्यांचे दोन्ही पायही कापण्यात आले. हा हल्ला भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (सीपीआय-एम) काही कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप आहे. कारण सदानंदन मास्टर डाव्या विचारसरणीपासून दूर गेले होते आणि दुसऱ्या विचारसरणीकडे वळले होते. या वेदनादायक घटनेनंतरही सी. सदानंदन मास्टर यांनी हार मानली नाही आणि शिक्षण आणि समाजसेवेत सक्रिय राहिले. या घटनेबाबत माहिती देताना सी. सदानंदन मास्टर म्हणाले की, एका टोळीने अचानक बॉम्ब फेकायला सुरुवात केली, घबराट निर्माण झाली, दुकाने बंद झाली आणि लोक धावाधाव करू लागले. टोळीने मला मागून पकडलं, रस्त्यावर झोपवलं आणि दोन्ही पाय गुडघ्याखालून कापून टाकले आणि फेकून दिले. पोलीस येईपर्यंत कोणालाही मदतीसाठी पुढे यायची हिंमत झाली नाही. शेवटी पोलिसांनी मला रुग्णालयात दाखल केलं, असं सी. सदानंदन मास्टर म्हणाले.

सदानंदन मास्टर सगळ्यांसाठी प्रेरणास्थान-

राजकीय हिंसाचारात जखमी होऊनही, सदानंदन मास्टर ज्या धाडसाने आणि कणखर आवाजाने समाजसेवा आणि शिक्षण क्षेत्रात योगदान देत आहेत ते त्यांची ताकद दर्शवते. सदानंदन मास्टर यांनी केवळ शिक्षण क्षेत्रात योगदान दिले नाही तर कठीण परिस्थितींना तोंड देत समाजासाठी देखील काम केले आहे. सदानंदन मास्टर यांचा प्रवास प्रेरणादायी राहिला असून आज ते देशातील सर्वात मोठ्या संसदेत आपली भूमिका बजावणार आहे.

राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती, VIDEO:

संबंधित बातमी:

Rajya Sabha Nomination: निकम, मास्टर, श्रृंगला अन् जैन; राष्ट्रपती कोट्यातून 4 जणांची राज्यसभेवर निवड, पाहा चारही जणांची A टू Z माहिती