मुंबई : लोकसभेनंतर (Lok Sabha Election)  आता विधानसभेच्या (Vidhan Sabha Election)  तयारीला सगळेच पक्ष लागलेत.  महायुतीली छोटे पक्ष विधानसभेला एकत्र राहणार की वेगळा निर्णय घेणार  याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.   प्रहार संघटना विधानसभेच्या 20 जागा लढवणार असल्याची घोषणा  प्रहार पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी केलीय. तर महायुतीत सहभागासंदर्भात सप्टेंबरनंतर निर्णय घेणार असल्याचं बच्चू कडू (Bacchu kadu)  यांनी स्पष्ट केलंय. तर दुसरीकडे बच्चू कडूंनी थोडं दमाणं घ्यावं, आपली लढाईही प्रस्थापितांसोबत आहे असा सल्ला रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot)  यांनी दिला.  तर नावाप्रमाणे कडूंनी कडू बोलणं टाळावं असा टोला  देखील सदाभाऊंनी लगावला आहे. 


सदाभाऊ खोत म्हणाले, बच्चूकडू यांनी थोडं दमाणं घ्यावं, आपली लढाईही प्रस्थापितांसोबत आहे. घाई करू नये. मात्र महायुतीतील बड्या मित्र पक्षांनीही थोडं समजून घ्यायला हवं, आम्ही काय बैलगाडयांना फक्त वंगाण घालायला बसलोय का ? बुंदीचे लाडू तुम्ही खात असाल तर चुरा तरी आमच्या नशीबी राहू द्या... मात्र या गोष्टी चर्चेतून सुटतात त्यामुळे नावाप्रमाणे बच्चू भाऊंनी कडू बोलणं टाळावे.  दिवाळीला आमच्या घरी लाडू बनवतात. जे  लाडू चांगले बनतात ते पाहुण्यांना देण्यात येतात, गरिबाला चुरा देतात आम्हाला किमान चुरा तरी द्या.. हे चुरा पण पळवत आहे आणि लाडू देखील पळवत आहेत, अस करु नका आम्हाला किमान चुरा तरी द्या.


कडूंनी जरा दमाणं घ्यावे,  बाहेर पडण्याची गडबड करु नये : सदाभाऊ खोत


विधानसभेला जागा नाही मिळाल्या तर वेगळी वाट निवडणार का? यावर खोत म्हणाले, आम्ही कशाला वेगळ्या वाटेवर जाऊ, जनता सक्षम आहे. जनतेला कळते काय सुरू आहे. निवडणुकीत जागा मागणे स्वाभाविक आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटते की, आपण ही निवडणूक लढवावी. पण कडूंनी जरा दमाणं घ्यावे.  बाहेर पडण्याची गडबड करु नये. कारण जो लढा दिला आहे प्रस्थापितांविरोधात आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची विचारधारा प्रस्थापितांची आहे. म्हणून त्यांनी महायुतीसोबत राहावे. 


शेतकऱ्याला जोखाडातून मुक्त करायचे असेल तर एनडीएमध्ये राहणे गरजेचे:  सदाभाऊ खोत


लक्ष्मणे रेखा ही महाभारतापासून  तयार झाली आहे.  कडू यांनी देखील अशी रेखा आखली असेल याचा अर्थ ते ओलांडणार असे नाही. त्यामुळे बच्चू भाऊ जरा धीराने धरा, या राज्याला देशाला आपल्याला प्रगतीवर न्यायचे आहे. कायद्याच्या बेड्या अडकल्या आहेत. जोखाडामध्ये शेतकरी अडकला आहे त्याला मुक्त करायचे असेल तर एनडीएमध्ये राहणे गरजेचे आहे, असे देखील खोत म्हणाले.  


बच्चू कडूंचा टोला 


लोकसभेचा पहिला टप्पा झाला आता दुसरा टप्पा येण्यासाठी वेळ आहे. दिवाळीला  गोड धोड खाऊ मग दुसऱ्या टप्प्यावर बोलू. पण आमचे बच्चू भाऊ आक्रमक असल्याने ते सुरुवातच कडू बोलण्यातून करतात. सगळी राजकीय परिस्थिती पाहिली तरी महायुतीत आमचे तीन पक्ष आहेत. आमच्या घटक पक्षांची परिस्थिती अशी आहे की, बैलगाडीला कशा नळ्या असतात त्यांचे काय काम असते चाकाला वंगण घालणे... मला असे वाटते आता या तीन पक्षांनी आमचे वंगण म्हणून वापर करू नये. वाडे तुमच्याकडे आले पण गावगाडे निघून गेले त्यामुळे मला असे वाटते की गावगाड्यातील माणसांना सोबत ठेवले पाहिजे. ही भूमिका ही तीन गड्यांनी घेतली आहे.  पण यांना असे वाटते की हे तीनच पैलवान आहेत. पण पहिल्यांदा नारळावरच्या कुस्त्या खेळायला लागतात, असे म्हणत खोत यांनी टोला लागवला आहे.


Video :