Sadabhau Khot Gopichand Padalkar Markadwadi: ईव्हीएम समर्थनार्थ मारकडवाडीत (Markadwadi) आज जाहीर सभा घेण्यात आली. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ईव्हीएमविरोधी सभेला प्रत्युत्तर देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. याच पार्श्वभूमीवर आज सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी मारकडवाडीत जाहीर सभा घेत तुफान फटकेबाजी केली. मी दंडवत घालायला आलो आहे. इतिहास घडवला, याची दखल देशाने घेतली. आता इंडियातील मोठा चोर राहुल बाबा येणार आहेत. ते आधी जायचे अमेरिका, जपानमध्ये जायचे. पण त्यांना माहिती नव्हतं. भारत नावाचा देश आहे, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली. तसेच त्याचे लग्न इथे लावू ...त्याचे स्वप्न आहे, पंतप्रधान झाल्यावर लग्न  करणार, अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.


पहिल्यांदा यांचा बाप देवाभाऊ आला- सदाभाऊ खोत (Sadabhau Khot On Sharad Pawar)


शरद पवारसाहेब लई हुशार...साहेबांना आता झोप लागेना...60 ते 70 वर्षे सत्ता भोगली...आता पहिल्यांदा यांचा बाप देवाभाऊ आला. देवाभाऊचा नावाचा वस्ताद या मातीत आला, असं सदाभाऊ खोत म्हणाले. लोकशाही वाचवण्याचे काम या गावाने केले. शरद पवार यांचा पक्ष नसून गुंड आणि लुटारुंची टोळी आहे आणि ते गाढायचे काम देवाभाऊने केले, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली. बॅलेट पेपरमध्ये घोटाळा करता येतो हे त्यांना लक्षत आले. हातात संविधान घेता आणि कायदा मोडता, असा टोलाही सदाभाऊ खोत यांनी लगावला. 2004 काँग्रेसने EVM मशीन आणली , 10 वर्ष सत्ता भोगली...त्यावेळी मशीन चांगली, असा सवालही सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला. 


दोन दिवसांपूर्वी शरद पवारांनी मारकडवाडीला दिली भेट-


मारकडवाडी येथील ग्रामस्थांच्या एका गटाने ईव्हीएम मशीन वर शंका घेत बॅलेटवरील मतदानासाठी सुरू केलेले आंदोलन आता चांगलाच जोर धरू लागले आहे . या गावातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांना मानणाऱ्या गटाने ईव्हीएम मशीन मध्ये गडबड झाल्याचा आरोप करीत बॅलेटवर मतदान घेण्याची मागणी केली होती. 3 डिसेंबर रोजी ग्रामस्थांनी स्वखर्चाने बॅलेट वर मतदानाची तयारी केली असताना प्रशासनाने जमावबंदीचा आदेश लागू केल्याने ही मतदान प्रक्रिया मागे घ्यावी लागली होती. यानंतर शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी या गावात भेट घेऊन आम्ही तुमच्यासोबत असल्याचे सूचित केले होते. 


नाना पटोले, उत्तम जानकरांसह पोहचणार मारकडवाडीत-


एका बाजूला राहुल गांधी या गावातून ईव्हीएम च्या विरोधात लॉन्ग मार्च काढणार अशा पद्धतीची तयारी सुरू असताना आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेही मारकडवाडी येथे येणार आहेत. त्यांचाही दौरा पडळकर यांच्या दौऱ्याच्या वेळीच होता मात्र प्रशासनाने त्यांना या वेळेला येण्यास परवानगी न दिल्याने ते आता दुपारी तीन वाजता गावात पोहोचणार आहेत .  नाना पटोले हे देखील आमदार उत्तम जानकर यांना घेऊन हेलिकॉप्टरनेच गावात पोहोचणार आहेत. 




Kurla Best Bus Accident: घरातून निघताना भांडण झालेलं?, मानसिक स्थिती कशी होती?; बस चालक मोरेच्या पत्नीने सगळं सांगितलं!