Sada Sarvankar: शिवसेना आमदार (शिंदे गट) सदा सरवणकर यांच्याविरोधात शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वतःचं शस्त्र दुसऱ्याला दिल्यामुळे त्यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदा सरवणकर यांचा शस्त्र परवाना रद्द होणार असल्याची माहिती विधान परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.       


Sada Sarvankar: सरवणकर यांचा शस्त्र परवाना रद्द


मिळालेल्या माहितीनुसार, शस्त्र कायद्यांतर्गत कोणत्याही व्यक्तीने बेकायदेशीरपणे शस्त्राचा वापर केला किंवा इतर कोणत्या व्यक्तीचं शस्त्र (बंदूक) वापरलं तर गुन्हा दाखल होतो. आता या सगळ्या प्रकरणावरून सरकारवर आरोप करण्यात आले होते की, ते सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्यामुळे त्यांना क्लीन चिट दिली गेली. त्यांच्यावर सरकार मेहरबान होतं, असे आरोप विरोधी पक्षांकडून वारंवार करण्यात आले आहे. यामुळे शस्त्र कायद्यांतर्गत नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे. यात सदा सरवणकर (Sada Sarvankar)  यांच्याविरोधात कारवाई झाल्याची असल्याची माहिती त्यांनी विधान परिषदेत दिली आहे. सदा सरवणकर यांना देण्यात आलेला शस्त्र परवान्यांचा दुरुपयोग करण्यात आला. कारण त्यांनी परवाना त्यांच्या नावावर असताना आपलं शस्त्र (बंदूक) एका दुसऱ्या व्यक्तीला दिलं आणि त्याकडून प्रभादेवीत फायरिंग झाली. यात सरवणकर यांच्याकडूनही गुन्हा झाला असल्याचं फडणवीस यांनी सांगत त्यांच्याविरोधात शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दिली. यासोबतच सरवणकर यांचा शस्त्र परवाना रद्द करण्याचा निर्णयही मुंबई पोलिसांनी घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं.   


Sada Sarvankar: काय आहे प्रकरण? 


गणेश विसर्जनासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शिवसेना आणि शिंदे गटाच्या समर्थकांमध्ये राडा झाला होता. यावेळी  दादर पोलीस ठाण्याबाहेर गोळीबार झाला होता. हा गोळीबार शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांनी केल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवालानुसार, ज्या बंदुकीतून गोळी सुटली होती, ती सदा सरवणकरांचीच होती हे स्पष्ट झालं होतं. पोलिसांनी घटनास्थळावरुन काडतूसं आणि सदा सरवणकरांच्या बंदुकीचे नमुने तपासले होते. बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे की, जप्त केलेली काडतूसं आणि त्यांच्या बंदुकीचे नमुने जुळले आहेत. त्यामुळे सरवणकर यांच्या अडचणींत भर पडली आहे. गणपती विसर्जनादरम्यान डिवचल्याच्या रागातून एकमेकांना गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये प्रभादेवीमध्ये शिवसेना आणि शिंदे गटात हाणामारी झाली. दादर पोलिसांनी दोन्ही गटांविरोधात गेल्या वर्षी 15 सप्टेंबर रोजी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. पुढे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी गोळीबार केली नसल्याचा अहवाल पोलिसांनी दिला. बंदूक ही सदा सरवणकर यांचीच आहे, पण गोळी झाडणारा व्यक्ती दुसराच असल्याचं पोलिसांच्या अहवालात सांगण्यात आलं होतं.