Sachin Ahir on Eknath Shinde MLA: मुंबई : एकनाथ शिंदेंचे (Eknath Shinde) काही आमदार उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे राज्यात आता पुन्हा राजकीय भूकंप पाहायला मिळणार का? अशा चर्चांना उधाण आलं आहे. आतापर्यंत एकूण सहा आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी एबीपी माझाला दिली आहे. शिवसेना ठाकरे गटात घेत असताना ज्या आमदारांनी तटस्थ भूमिका घेतली, त्यांचाच विचार ठाकरे गटाकडून केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. यावर प्रतिक्रिया देताना संपर्कात असलेल्या आमदारांती संख्या 40 असू शकते, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे.
ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी बोलताना अनेक गौप्यस्फोट देखील केले आहेत. आमच्या संपर्कात सहा ते सात आमदार असल्याची माहिती कुठून समोर आली माहिती नाही. मात्र, हा आकडा 16 किंवा अगदी 40च्या घरातही असू शकतो. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिंदे गटातील आमदार अस्वस्थ झाले असतील. आता आपलं सरकार जाणार, ही भीती त्यांच्या मनात असावी. त्यांची भीती आणि अस्वस्थता स्वाभाविक आहे. त्यांच्या मतदारसंघात आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. हा प्रयोग काही आता झालेला नाही. लोकसभा निवडणुकीच्यावेळी शिंदे गटातील काही आमदारांनी ठाकरे गटाशी संपर्क साधला होता. आम्ही लोकसभेला तुम्हाला मदत करु, पण विधानसभेला आमचा विचार करा, असा प्रस्ताव शिंदे गटातील या आमदारांनी ठाकरेंसमोर ठेवला होता, असे सचिन अहिर यांनी म्हटलं आहे.
आकडा केवळ पाच, सहा नाहीतर, 40 देखील असू शकतो : सचिन अहिर
शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी एबीपी माझाला याबाबत प्रतिक्रिया दिला. ते म्हणाले की, "6 ते 7 हा आकडा कुठून आला मला माहिती नाही, पण हा आकडा 16ही असू शकतो, 20 सुद्धा असू शकतो किंवा 40 देखील असू शकतो. कारण ज्या लोकांना वाटलं की, आता आमचंच सरकार राहणार आहे, आता आम्हीच निवडून येणार आहोत, ज्यांनी शपथ घेऊन सांगितलेलं आता एकाही आमदार-खासदाराला मी सोडू देणार नाही, आता निकालानंतर अस्वस्थता वाढणारच, त्यांच्या मतदारसंघात, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थतेचं वातावण झालं आहे. याचा पश्चाताप त्यांना होत असेल तर ते ती संख्या सहा नाही, तर 10 किंवा 20 असू शकते."
"आता लोकसभा निवडणुकांमध्येही अनेक आमदारांनी, अपक्ष नेत्यांनी आमचा विचार करा, अशी गळ घातली होती. आम्ही लोकसभेत मदत करतो, विधानसभेत आमचा विचार करा, असंही त्यांनी सांगितलं. पण, आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं. पण त्यावेळी आम्ही स्पष्ट सांगितलेलं की, दरवाजे बंद आहेत."
पाहा व्हिडीओ : Sachin Ahir On Shivsena : एकनाथ शिंदेंचे 40 आमदार पुन्हा ठाकरे गटात जाणार? चर्चांना उधाण
महत्त्वाच्या इतर बातम्या :