मुंबई 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपला (BJP)  केवळ  240  जागा मिळाल्या, याचं कारण म्हणजे भाजप नेत्यांचा अति आत्मविश्वासामुळे, अशी टीका राष्ट्रीय स्वयंसेवक (RSS)  संघाशी संबंधित ऑर्गनायझर या मासिकात करण्यात आलीय. संघाचे स्वयंसेवक रतन शारदा यांनी हा लेख लिहिला आहे. महाराष्ट्रात अजित पवारांसोबत हातमिळवणी आणि काँग्रेस नेत्यांना पक्षात प्रवेश दिल्याने भाजपला झटका बसल्याचं ते म्हणाले. तसंच भाजप आणि शिदेंकडे आवश्यक बहुमत असूनही अजित पवारांशी हातमिळवणी का केली, असा सवाल रतन शारदा यांनी लेखात विचारला आहे 


  संघाने काम केलं नाही हा आरोप निरर्थक आहे.  स्थानिक भाजप नेत्यांनी संघ विचार संस्थांशी संपर्क केला का, असा सवाल ऑर्गनायझरमधून करण्यात आला आहे. 26/11 ला संघाचा कट म्हणणारे नेते भाजपमध्ये आले? कृपाशंकर सिंह यांच्या भाजप प्रवेशावर ऑर्गनायझरमधून टीका करण्यात आला आहे. 26/11 प्रकरणी संघावर आरोप करणारे कोणतीही तमा न बाळगता भाजप नेते झाले. 


जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झालं का?


अनेक वर्ष  काँग्रेसच्या ज्या विचारधारेच्या विरोधात लढाई केली, सत्तेसाठी आज त्याच काँग्रेसमधील लोकांच्या मांडीला मांडी लावून बसले. यामुळे कार्यकर्ता दु:खी झाले. 26/11 ला संघाचा कट म्हणणारे काँग्रेस नेत्यांना भाजपमध्ये सहभागी करून घेतेले . यामुळे  संघाच्या स्वयंसेवकांना मोठा धक्का बसला. निष्कारण राजकारण करत बसल्याचे महाराष्ट्र उदाहरण आहे. शरद पवार घरातील भांडणे सोडवण्यात व्यस्त राहिले असते. अजित पवारांना सोबत घेण्याची काय गरज होती. आयेगा तो मोदी, चारसो पार, हा अतिआत्मविश्वास ? जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झालं का? असे अनेक सवाल उपस्थित करण्यात आले आहे. 


संघ आणि भाजप संबंध कोणत्या दिशेने जाणार?


लोकसभा निवडणुका, त्यासाठी सर्वच पक्षांकडून झालेला कडवा प्रचार आणि त्यानंतर आलेल्या निकालाबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाराज आहे का? संघाच्या कार्यकर्ता विकास वर्गाच्या समारोपीय सोहळ्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजप, काँग्रेससह सर्वच पक्षांना कानपिचक्या दिल्याच. शिवाय नाव न घेता भाजपच्या केंद्रीय धुरिणांची ही कथित "मी पणा बद्दल" कान  उघाडणी केली. त्यामुळे येणाऱ्या दिवसात संघ आणि भाजप संबंध कोणत्या दिशेने जाणार हे महत्वाचे ठरणार आहे. 


सरसंघचालकांची काँग्रेसच्या खोट्या प्रचारावर नाराजी 


निवडणूक लढवताना एक मर्यादा पाळायची असते, मात्र, यंदा देशातील निवडणुकीत त्या मर्यादेचा पालन झालं नाही अशी उघड खंत सरसंघचालकांनी बोलून दाखविली निवडणुकीच्या प्रचारामध्ये ज्या पद्धतीने वक्तव्ये करण्यात आली,  त्या वक्तव्यांमुळे समाजात तेढ निर्माण होईल याचा विचार ही करण्यात आला नाही. आणि त्यामध्ये आम्हालाही ( संघासारख्या संघटनाना ) नाहक ओढण्यात आले.  टेक्नॉलॉजीचा वापर करून असत्य मांडण्याचा प्रयत्न झाला  निवडणुकीत दोन पक्षांमध्ये स्पर्धा असते, एकमेकांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न असतो, मात्र त्यासाठी असत्याचा वापर करण्यात येऊ नये, अशाने देश कसा चालेल असे सरसंघचालक म्हणाले.


हे ही वाचा :


राजकीय पक्षांना सरसंघचालकांच्या कानपिचक्या, सध्य परिस्थितीवरुन सर्वांना खडे बोल! नेमकं काय म्हणले मोहन भागवत?