Kirit Somaiya on Mumbai South Lok Sabha Election Result 2024: मुंबई : देशातील लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) रणधुमाळीची सांगता मोदींच्या (PM Modi) शपथविधीनं झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी विराजमान झाले. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात (South Mumbai Lok Sabha Constituency) ठाकरेंच्या शिवसेनेचे (Shiv Sena Uddhav Thackeray Group) उमेदवार अरविंद सावंत यांचा विजय झाला. तर शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांना पराभवाचा सामना करावा लागला. आता दक्षिण मुंबई लोकसभा निवडणुकांच्या निकालावरुन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मोठा आरोप केला आहे. मुंबादेवीमध्ये वोट जिहाद झाल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. 


मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात अरविंद सावंत यांचा विजय झाला. पण दक्षिण मुंबईमध्ये येणाऱ्या मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात वोट जिहाद झाल्याचा मोठा आरोप किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आला आहे. बूथ 191 मध्ये यामिनी जाधव यांना केवळ एकच मत मिळालं आहे. तर, अरविंद सावंत यांना या बूथमध्ये तब्बल 311 मतं पडली आहेत. 


भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, "मुंबईतील मुंबादेवी येथेही उद्धव ठाकरेंसाठी वोट जिहाद झाल्याचं पाहायला मिळालं. भेंडीबाजार, मोहम्मद अली रोड, चोर बाजार इथे 38 बूथवर महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांना एक आकडी मतं मिळाली आहेत. बूथ 191 मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांना केवळ एकच मत मिळालं, तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांना या 311 मतं मिळाली आहेत. वोट जिहाद आता मुंबादेवी मातेच्या चरणीही पोहोचला आहे.


किरीट सोमय्यांविरोधात मुस्लिम संघटना आक्रमक 


भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कार्यालया बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मानखुर्दमधील मुस्लिम संघटनांनी मोर्चा थोड्याच वेळात किरीट सोमय्याचा निवास स्थानी दाखल होणार आहेत. ईशान्य मुंबईतील लोकसभा निवडणुकीत मानखुर्दमध्ये बांगलादेशीनी मतदान केल्याची टिका किरीट सोमय्या यांनी केली होती, त्याविरोधात मुस्लिम संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. 


पाहा व्हिडीओ : Kirit Somaiya : 38 बूथवर यामिनी जाधवांना एक आकडी मतं,सोमय्या काय म्हणाले?