Sanjay Raut : शिंदे गटाला (Shinde Group) धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना (Shiv Sena) हे नाव देण्यासाठी आतापर्यंत 2000 कोटींचा व्यवहार झाल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊतांनी (Sanjay Raut) केला आहे. तसेच हा प्राथमिक आकडा असून 100 टक्के सत्य असल्याचा दावाही संजय राऊतांनी (Sanjay Raut) केला. राऊतांच्या (Sanjay Raut) या दाव्यानंतर राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. यावरच आता शिवसेना प्रवक्ते (शिंदे गट) नरेश मस्के यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 'संजय राऊत (Sanjay Raut) यांचं डोकं ठिकाणावरती आहे का? असा प्रश्न विचाराली वाटतो', असं ते म्हणाले आहेत.
'संजय राऊत यांचं मानसिक संतुलन बिघडलं'
नरेश मस्के म्हणाले आहे की, ''संजय राऊत (Sanjay Raut) यांचं डोकं ठिकाणावर आहे का? असा प्रश्न विचारावा वाटतो. रात्रीची भांग असेल ,रात्रीच्या गावठी ब्रँड असेल ,कदाचित त्यांच्या बरळण्यावर वरती याचा परिणाम झाला आहे. मी वारंवार सांगतोय आमच्या ठाण्यामध्ये फेमस हॉस्पिटल आहे. संजय राऊत यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. त्यांना ट्रिटमेंटची गरज आहे. त्यांनी एक सुपारी घेतली होती, शिवसेना संपवण्याची. राष्ट्रवादीकडून असेल कोण म्हणते शरद पवार साहेबांनी त्यांना सुपारी दिली होती. शिवसेना संपवण्याची आणि त्यांनी त्यांचं काम फत्ते केलेलं आहे. लोकशाहीमध्ये न्याय जिवंत आहे आणि आता त्यांच्या विरोधात निर्णय दिला की, न्यायालयावरती टीका करणार.''
ते म्हणाले की, ''नरेंद्र मोदी (Pm Modi) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो लावले. लोकांसमोर जाताना शिवसेना भाजपा युती म्हणून आम्ही निवडणुका लढवल्या आणि नंतर आपल्या खुर्ची करता यांच्याविरुद्ध निवडणुका लढवल्या. काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल त्यांच्याबरोबर एक मुख्यमंत्र्याची खुर्ची मिळावी म्हणून आम्ही भाजपाला बाजूला सोडल प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी जी युती केली होती, त्यांना आम्ही बाजूला केलं आणि त्यांचे विरोधात लढलो. त्याच्या बरोबर सत्तेत बसलो हे अमित शहा बरोबर बोलले.''
Sanjay Raut: संजय राऊत यांच्या आरोपाला आशिष शेलार यांचे प्रत्युत्तर
संजय राऊत (Sanjay Raut) यांनी निवडणूक आयोगाच्या निकाल संदर्भात केलेल्या आरोपावर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले आहेत की, संजय राऊत यांनी काय आरोप केले, याला मी महत्व देत नाही.
संबंधित बातमी: