Rohit Pawar on Ajit Pawar : "लहान मुले म्हणतात की, पणजोबाला सोडायच नाही जर सोडलं तर मी बोलणार नाही. हे मुलाला कळत. मला काही जण बच्चा म्हणतात, पण मला एवढं कळत की वडीलधाऱ्यांना सोडायचं नाही. काही जण म्हणतात मला कुणाची जागा घ्यायची आहे. पण मला कुणाची जागा घ्यायची नाही. होलसेलमध्ये इथे पक्षाची चोरी झाली आहे", असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले. ते बारामती (Baramati) येथील सभेत बोलत होते. 


रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, आज दुधाचे दर कमी झाले आहेत. साहेब ज्यावेळी सत्तेत होते त्यावेळी मार्ग काढायचे. परिस्थिती कोणतीही ही शरद पवार मार्ग काढतात. साहेबांनी बारामतीचा विकास केला म्हणून बारामती पुढे गेली. साहेबांचा स्वभाव बदलला नाही, आहे तसेच साहेब आहेत. जसे बोलले तसे वागले. आता काही लोकांनी भूमिका घेतली.


आज मला बँका लोन देत नाहीत


पुढे बोलताना रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, आज काहीजण म्हणत आहेत याने काय संघर्ष केला. मला सत्तेत जाणं सोपं होतं, पण मी गेलो नाही. माझा व्यवसाय अडचणीत होता मी बाहेर काढला. आज मला बँका लोन देत नाहीत. अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. भूमिका बदलायची नसते. पक्ष फोडायला अटी लावत नाहीत पण शेतकऱ्यांना अनुदान द्यायला बर अटी लावता. 


भाजप नेत्यांना बोलायच्या आधी परवानगी घ्यावी लागते


चंद्रकांत पाटील बारामतीत आले होते साहेबांवर बोलले. भाजपाला साहेबांना संपवायच आहे. आम्ही साहेबांवर निशाणा साधला तर आम्ही ऐकून घेणार नाही. बँकेचा टॅक्स अडीच टक्क्यांनी वाढला. खासदार होऊन उपयोग नसतो. प्रश्न सुटण्यासाठी खासदाराला बोलावं लागते.  भाजप नेत्यांना बोलायच्या आधी परवानगी घ्यावी लागते. आपल्या सोबत असताना प्रेस कॉन्फरन्स कोण गाजवत होत ? आता तिकडे गेल्यावर त्यांना किती वेळ बोलायला मिळतं? कुटुंबातील सदस्य म्हणून वाईट वाटतं, असंही रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Udayanraje Bhosle: लोकसभेच्या उमेदवारीसाठी उदयनराजे भोसले दोन दिवसांपासून दिल्लीत, पण अमित शाहांची भेट मिळालीच नाही