Ahmednagar Politics : नाशिक पदवीधर निवडणुकीत (Nashik Graduate Constituency Election) सुरु असलेल्या राजकीय नाट्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी म्हटलं की, "काँग्रेसचा (Congress) हा अंतर्गत विषय आहे, कोणाला उमेदवारी द्यायची, नाही द्यायची याबाबत बसून चर्चा करुन त्या ठिकाणी तो विषय संपला पाहिजे होता, पण तो संपला नाही. मात्र यावरुन कन्फ्युजन खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे, त्यामुळे सगळ्यांनीच एकत्रित बसून याला एका निर्णायक पातळीवर नेण्याची गरज आहे. सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी यामध्ये लक्ष घालून काँग्रेसला थोडंसं सांगून काही मार्ग निघतोय का? हे बघायला पाहिजे." 


सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी भाजपच्या नेत्यांसोबत बैठक घडवून आणण्यासाठी भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी पुढाकार घेतल्याचे वृत्त समोर आले होते. याबाबत रोहित पवार म्हणाले, "सत्यजित तांबे आणि डॉ सुधीर तांबे हे दोघे सक्षम आहेत. त्या ठिकाणी बैठक करण्यासाठी जर त्यांना कुणी मदत केली असेल तर त्यांनाच याबद्दल विचारला हवं."


दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. पदवीधरसाठी काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली होती. ऐनवेळी सुधीर तांबेंऐवजी त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी अर्ज दाखल केला. "सुधीर तांबे यांनी काँग्रेसशी दगाफटका केला. त्यामुळे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार नाही," अशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं.


कोरोना काळात चहल यांचं काम मोठं


इक्बाल सिंह चहल (Iqubal Singh Chahal) यांना आलेल्या ईडीच्या समन्सबद्दल बोलताना रोहित पवार म्हणाले की, "कोरोना काळामध्ये चहल यांनी खूप मोठे काम केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीही त्यांचे कौतुक केले होते. मात्र शिवसेनेने मुंबईत केलेले काम महापालिका निवडणुकीत भाजपाला कदाचित अडचणीत आणू शकते त्यामुळेच गोंधळात गोंधळ करण्याचा कदाचित हा प्रयत्न असेल असं वाटतं." "एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याला अशा पद्धतीने अडचणीत आणणं हे योग्य नाही," असं रोहित पवार म्हणाले. 


गुलाबराव पाटील यांनी बोलताना म्हटल होतं की, "जसे 'आप'ने आपले गेलेले आमदार परत आणले, तसे शिवसेनेलाही आणता आले असते", त्यामुळे गुलाबराव पाटील यांनी पुन्हा शिवसेना एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत का? यावर विचारले असता थोडे दिवसातच बघा काय होत असे म्हटले आहे.


हेही वाचा


Ahmednagar Politics : रोहित पवार की राम शिंदे, आगामी विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेडमध्ये कोणाचा विजय? समर्थक कार्यकर्त्यांमध्ये एक लाखाची पैज