Chitra Wagh On Urfi Javed: अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यातील वाद काही संपता संपत नाही. उर्फीच्या कपड्यांवर चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतल्याने सुरु झालेला हा वाद आता टोकाला जाऊन पोहचला आहे. दरम्यान दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहे. त्यातच आता चित्रा वाघ यांनी आपल्याला धमकावले असून, मला असुरक्षित वाटू लागल्याने सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी उर्फिने महिला आयोगाकडे केली आहे. तर मला धमक्या देण्याची गरज नाही, मी फक्त इशारा दिला असल्याचं प्रत्युत्तर चित्रा वाघ यांनी दिले आहे. 


चित्रा वाघ आज औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान यावेळी बोलतांना उर्फी जावेदला मी कुठलीही धमकी दिली नसल्याचं चित्रा वाघ म्हणाल्या. मात्र मी तिला इशारा दिला असून, ते अजूनही देत असल्याचं त्या म्हणाल्यात. तर अशी नागडी उघडी फिरू नको एवढंच माझं म्हणणे असून, असे म्हणणे धमकी आहे का? असा प्रतिसवाल चित्रा वाघ यांनी केलाय. उर्फिने महिला आयोगाकडे तक्रार केली आहे, तील तक्रार करू द्या अशा तक्रारी होत असतात. पण आमचा आक्षेप फक्त तिच्या कपड्यावर असून, इतर गोष्टींवर नाही. त्यामुळे तिने असे कपडे घालून फिरू नयेत आणि तिला अजूनही आमचा इशारा आहे असेही चित्रा वाघ म्हणाल्यात. 


असले हरामखोर पोलीस अधिकारी नकोच! 


औरंगाबाद शहर पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे यांनी आपल्याच एका मित्राच्या पत्नीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. यावरून चित्र वाघ यांनी संताप व्यक्त करत, असले हरामखोर पोलीस अधिकारी नकोच अशी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलतांना त्या म्हणाल्यात की, असले हरामखोर पोलीस अधिकारी पोलीस दलात नको पाहिजे. महाराष्ट्राला त्यांची गरज नाही. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी आणि त्यांना पोलीस दलातून बडतर्फ करावे अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. दरम्यान यावेळी त्यांनी पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांची भेट देखील घेतली. तसेच संपूर्ण प्रकरण जाणून घेऊन, कारवाई मागणी देखील केली. 


उर्फीचा गंभीर आरोप... 


या सर्व वादा दरम्यान उर्फी जावेदने महिला आयोगाला एक पत्र लिहून सुरक्षेची मागणी केली आहे. आपल्याला चित्रा वाघ यांनी धमकावले आहे. त्यामुळे मला घरात आणि घराबाहेर असुरक्षित वाटू लागले असून, आपल्याला सुरक्षा पुरवण्यात यावी असं तिने महिला आयोगाला लिहलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यातील वाद आणखीनच वाढतांना पाहायला मिळत आहे. 


संबंधित बातम्या: 


Urfi Javed Struggle : घरच्यांच्या छळाला कंटाळून सोडलं घर, आठ दिवस काढले पार्कात; वाचा उर्फी जावेदच्या संघर्षाची कहाणी...