Rohit Pawar on Dhananjay Munde :  परळी तालु्क्यातील मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांचा खून झाल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बबन गिते फरार आहेत. दरम्यान, याप्रकरणावरुन आमदार रोहित पवार यांनी सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे. परळीत धनंजय मुंडेंचे मास्टरमाईंड आहेत, असंही पवार यांनी म्हटलं होतं. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या समर्थकांकडून परळी बंदची हाक देण्यात आली होती. शिवाय, रोहित पवार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड परळीला बदनाम करत आहेत, असा आरोपही धनंजय मुंडे यांच्या समर्थकांकडून करण्यात आला होता. रोहित पवारांनी आता आरोपांना प्रत्युत्तर दिलंय. 


रोहित पवार काय म्हणाले? 


परळीचं नाव आम्ही खराब करत नाहीत. परळीतील लोक जबरदस्त आहेत. मी अनेकवेळा तिथे गेलो आहे. तिथे गेल्यानंतर मी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे मोठे नेते आहेत, हेही सांगितलं आहे. पण कराड नावाचा जो तिथला कार्यकर्ता आहे, तो मास्टरमाईंड आहे. धनंजय मुंडेंचं परळीत काही चालत नाही, कराड नावाच्या मास्टरमाईंडचं सगळं चालतं. आता कराड जी व्यक्ती आहे, छोट्याशा दुकानदारापासून मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांकडून कमिशन घेतात, असं मला कळालं आहे. 


कराड हा नेता अडचणीत आलाय, त्यामुळे आंदोलन करत आहेत


पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, जे बबन गिते आहेत, ते चुकीचे असतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण चूक नसताना त्यांच्यावर कारवाई होणार असेल तर आम्ही सहन करणार नाहीत. परळीतील लोकांनाही दडपशाही आवडत नाही. तेथील कार्यकर्त्यांनी पाण्यासाठी, शेतकऱ्यांसाठी किंवा नोकरीसाठी आंदोलन केलं नाही, पण त्यांचा कराड हा नेता अडचणीत आलाय, त्यामुळे आंदोलन करत आहेत. माझ्या एका स्टेटमेंटमुळे त्यांनी संपूर्ण शहराला वेठीस धरलंय, यावरुन त्यांची दहशत लक्षात येते. 


बापू आंधळे खून प्रकरण नेमकं काय आहे? 


बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात झालेल्या गोळीबारात एकजण जागीच ठार झाला होता, तर दोघे गंभीररित्या जखमी झाले होते.  परळी शहरातील बँक कॉलनीमध्ये गोळीबाराचा हा थरार घडला. दरम्यान, या गोळीबारामध्ये मरळ वाडीचे सरपंच बापू आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे हे प्रकरण राज्यभर चर्चेचा विषय बनलय. नंदागौळ येथील ग्यानबा मारोती गित्ते आणि महादेव गीते हे दोघे गोळीबारात गंभीर जखमी झाले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या


राज ठाकरे साहेबांची ऍलर्जी आहे का? तुमचे लोकेशन पाठवा; हभप पुंडलिक महाराज थेटे यांना अज्ञातांकडून जीवे मारण्याची धमकी