Ahmednagar : तु्म्हाला आमच्या राज ठाकरे (Raj Thackeray) साहेबांची एॅलर्जी आहे का? असे म्हणत संत निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याचे सदस्य हभप पुंडलिक महाराज थेटे (Pundalik Maharaj Thete) यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पुंडलिक महाराज थेटे (Pundalik Maharaj Thete) हे शेंडी गावात मुक्कामी असताना त्यांना फोनवरुन ही धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी एमआयडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
तुमच्या तोंडाला अहमदनगरमधील कार्यकर्ते काळे फासतील
तुम्हाला आमच्या राज साहेब ठाकरे (Raj Thackeray) यांची एलर्जी आहे का तुम्ही आता कुठे आहात. तुमचे लोकेशन पाठवा. तुमच्या तोंडाला अहमदनगरमधील (Ahmednagar) कार्यकर्ते काळे फासतील, असा दमही अज्ञात व्यक्तीकडून थेटे महाराज (Pundalik Maharaj Thete) यांना देण्यात आलाय. तसेच तुम्हाला जर हे संकट टाळायचे असेल तर मला एक लाख रुपये द्या नाही, तर जीवे मारून टाकीन, अशी दिली धमकी अज्ञात व्यक्तीने दिली आहे. या प्रकारामुळे वारकऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून आरोपीला लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे.
तुम्हाला जर हे संकट टाळायचे असेल तर मला एक लाख रुपये द्या
दरम्यान, याप्रकरणी याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत हभप पुंडलिक महाराज थेटे (Pundalik Maharaj Thete) यांनी फिर्याद दिली आहे. संत निवृत्तीनाथ महाराज यांची दिंडी मंगळवारी अहमदनगर शहरापासून जवळच असलेल्या शेंडीगावात पोहोचली होती. त्यातच हभप थेटे महाराज (Pundalik Maharaj Thete) यांना अज्ञातांकडून धमकीचा फोन आला. पहिल्यांदा आलेला कॉल त्यांनी उचलला नव्हता. मात्र, काही वेळाने पुन्हा एकदा त्यांना फोन आला. त्यांनी फोन उचलला असता तुम्हाला आमच्या राज साहेब ठाकरे (Raj Thackeray) यांची एलर्जी आहे का तुम्ही अत्ता कुठे आहात. तुमचे लोकेशन पाठवा. तुमच्या तोंडाला अहमदनगरमधील (Ahmednagar ) कार्यकर्ते काळे फासतील, असा दम दिला. तसेच तुम्हाला जर हे संकट टाळायचे असेल तर मला एक लाख रुपये द्या नाही, तर जीवे मारून टाकीन, अशी धमकी दिली. त्यानंतर फोन कट झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Varsha Gaikwad : गद्दारांना महाराष्ट्रात थारा नाही, 240 जागांच्या बदल्यात भाजपला 440 व्होल्टचा झटका बसला, वर्षा गायकवाड यांची लोकसभेत फटकेबाजी