Rohini Khadse On Pranjal Khewalkar: पुण्यातील रेव्ह एका पार्टीवर (Pune Rave Party) काल (27 जुलै) पोलिसांनी धाड टाकली. या  कारवाईत एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) यांना अटक करण्यात आली. सदर प्रकरणी सर्व आरोपींना काल न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी प्रांजल खेवलकरसह सातही आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Continues below advertisement


पती प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) यांना अटक केल्यानंतर रोहिणी खडसे (Rohini Khadse On Pranjal Khewalkar) यांनी एक्सवर पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कायद्यावर व पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं. योग्य वेळी सत्य बाहेर येईल, असं रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, रोहिणी खडसे यांनी दोन पोस्ट केल्या आहेत. यामध्ये दोन्ही पोस्टमध्ये वाक्य जसास तसे आहे, मात्र फोटो वेगवेगळे आहेत.  पहिली पोस्ट 28 जुलै रोजी सकाळी 8 वाजून 59 वाजता केली आहे. तर दुसरी पोस्ट सकाळी 9.09 मिनिटांनी केली आहे.


रोहिणी खडसेंची पहिली पोस्ट-



रोहिणी खडसेंची दुसरी पोस्ट-


रोहिणी खडसेंची पुणे पोलीस आयुक्तांसोबतची भेट रद्द-


रोहिणी खडसेंची पुणे पोलीस आयुक्तांसोबतची भेट रद्द झाली आहे. पती प्रांजल खेवलकर यांच्यावर झालेल्या कारवाईबद्दल चर्चा करण्याचं शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ठरवलं होतं. स्वत: रोहिणी खडसे, रोहित पवार आणि शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आयुक्तांना भेटणार होते. रोहित पवार यांच्या पीएकडून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी संपर्क करुन भेटीची वेळ नक्की केली होती. अमितेश कुमार यांनी अकरा वाजता भेटण्याचे मान्य केले होते. त्यासाठी माध्यमांच्या प्रतिनिधींनी साडे दहा वाजता पोलीस आयुक्तालयात जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. ही भेट माध्यमांच्या कॅमेराशिवाय होईल असे सांगण्यात आले. मात्र काही मिनिटांतच राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी भेट रद्द झाल्याचे जाहीर केलं. रोहिणी खडसे वेळेत पोहचू शकत नसल्याने भेट रद्द झाल्याचे सांगण्यात आले. रोहिणी खडसे यांची मात्र यावर प्रतिक्रिया आलेली नाही. 




संबंधित बातमी:


Rohini Khadse On Pranjal Khewalkar: रेव्ह पार्टीत पती प्रांजल खेवलकरांना अटक; रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...