Rekha Thakur on Sanjay Raut : "संजय राऊत यांना खऱ्या खोट्याच भान राहिले नाही. वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकरांना बदनाम करण्यासाठी तोल गेल्याप्रमाने बरळत आहेत. संजय राऊतांमुळे त्यांचा अख्खा पक्ष सोडून गेला. संजय राऊतची भूमिका हीच उद्धव ठाकरे, शरद पवार, भूमिका आहे का? महाविकास आघाडीची अधिकृत भूमिका समजायची का?", असं वचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर म्हणाल्या. बाबासाहेब आंबेडकरांचे खरे वारसदार रामदास आठवले आहेत, असं म्हणत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रकाश आंबेडकरांना टोला लगावला होता. त्यानंतर रेखा ठाकूर (Rekha Thakur) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 


रेखा ठाकूर म्हणाल्या, वंचितला बैठकीला बोलण्याचे टाळणारे म्हणत आहेत की, 7 जागा देऊ केल्या होत्या. अश्या खोट्या थापा राऊत मारत आहे. महाराष्ट्रातील जनतेला संविधानाची आण देऊन मते घेतली आणि आता त्याच संविधानातील आरक्षणाच्या मुद्द्यावर ओबीसींचे आरक्षण धोक्यात आलेले असताना शिवसेना भूमिका स्पष्ट का करत नाही? असा सवलाही रेखा ठाकूर यांनी उपस्थित केला. संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांना टोला लगावल्यानंतर रेखा ठाकूर चांगल्याच संतापल्या आहेत. 


संजय राऊत काय काय म्हणाले ?


संजय राऊत म्हणाले, लोचट मुख्यमंत्री दिल्लीच्या दारात गेलाय. मुख्यमंत्री लोचट मजनू आहेत. अतिशय  लोचट मुख्यमंत्री दिल्लीच्या दारात गेलाय. यापूर्वी दिल्लीसमोर झुकणारे अनेक मुख्यमंत्री पाहिले, पण इतका लोचट मुख्यमंत्री पाहिला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला वेदना होईल असं वर्तन मुख्यमंत्री करतात. हे दिल्लीचे पोपट म्हणून बोलतात. ज्या दिवशी त्यांना दिल्ली पायाशी ठेवणार. महाराष्ट्राला बदल हवाय त्यासाठी आम्ही कंबर कसतो आहोत, असं खासदार संजय राऊत म्हणाले. 


काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर? 


प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की, "उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या मतांचा अभ्यास केला तर समजेल की एकनाथ शिंदे यांचा स्ट्राईक रेट सरळसरळ डबल आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की शिवसेनेची मतं एकनाथ शिंदे यांच्याकडे राहिली आहेत. आता शिवसैनिक एकनाथ शिंदे यांनाच खरी शिवसेना मानतो आहे. उद्धव ठाकरे यांचा स्ट्राईक रेट हा आरक्षणवादी आणि मुस्लीम यांच्यामुळे वाढला आहे." 


इतर महत्वाच्या बातम्या


Jayant Patil : अजितदादा म्हणाले जय पवारांच्या उमेदवारीबाबत पार्लमेंटरी बोर्डामध्ये विचार होणार, जयंत पाटील म्हणाले, अजित पवार म्हणजेच पार्लमेंटरी बोर्ड