Ravindra Waikar vs Shivsena Uddhav Thackeray : शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्यावर गंभीर आरोप करत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. शिवाय, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्याकडे रवींद्र वायकर यांना अपात्र ठरवण्यासाठी वकील असीम सरोदे यांच्यामार्फत अर्ज करण्यात आला आहे. नेमकं प्रकरण काय आहे? जाणून घेऊयात..
असीम सरोदेंचे रवींद्र वायकरांवर गंभीर आरोप
रवींद्र वायकर यांचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी जवळचे संबंध होते आणि शिवसेनेच्या मूळ राजकीय पक्षाशी त्यांचे दीर्घकाळचे संबंध होते. शिवसेनेचे नोव्हेंबर 2023 मध्ये दोन गटात विभाजन झाल्यापासून वायकर हे उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे दिसले. जोगेश्वरी येथील पंचतारांकित हॉटेलच्या इमारतीशी संबंधित मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने वायकर यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. यामध्ये दाखल केलेल्या एफआयआरमुळे ईडीकडून मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास सुरू होता. त्यामुळे रवींद्र वायकर आणि त्यांच्या कुटुंबियांना अटक होण्याची भीती निर्माण झाली. याच भीतीपोटी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला, असा आरोप असीम सरोदे यांनी केला आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे देखील आक्षेप अर्ज करणार आहोत
शिवाय, वायकर यांना उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने ॲड असीम सरोदे यांनी वायकर यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. यातून वायकर यांच्यावर अपात्रतेची कारवाई का करण्यात येऊ नये? याचे स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. तसेच या संदर्भात उद्धव ठाकरे शिवसेना लवकरच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे देखील आक्षेप अर्ज करणार आहोत ,अशी प्रतिक्रिया अडव्होकेट असीम सरोदे यांनी दिली आहे.
रवींद्र वायकर यांना उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी
मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंनी गजानन किर्तिकर यांचे पुत्र अमोल किर्तिकर यांना मैदानात उतरवले आहे. तर एकनाथ शिंदे यांनी नुकतेच ठाकरे गटातून शिंदे गटात आलेल्या रवींद्र वायकर यांना उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. दरम्यान, जड अंतःकरणानेच मी पक्ष बदलला, असं म्हणणारे रवींद्र वायकर ठाकरेंना छुपी मदत करतील, अशा चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. कारण शिंदे गटात प्रवेश करतानाही रवींद्र वायकर यांच्या चेहरा पडलेलाच दिसत होता. त्यामुळे शिंदे गटातून निवडणूक लढताना वायकर जोर लावणार की, छपी मदत करणार ? असा सवाल उपस्थित केला जातोय.
इतर महत्वाच्या बातम्या
Raj Thackeray Pune Speech : पुण्याचा दांडगा अभ्यास, अजित पवार, फतवा, राम मंदिर ; राज ठाकरेंच्या पुण्यातील भाषणाचे प्रमुख 10 मुद्दे