मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर आता सर्वांना वेध लागले आहेत ते मुख्यमंत्र्‍यांच्या शपथविधी सोहळ्याचे. मात्र, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे अद्यापही अस्पष्ट आहे. मुख्यमंत्रीपदी भाजप नेता शपथ घेईल, पण तो कनेता कोणता हे अद्यापही अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं आहे. भाजपचे निवडणूक समिती प्रमुख रावसाहेब दानवे (Raosaheb Danway) यांनी याबाबत माहिती दिली. मी निवडणूक समितीचा प्रमुख असल्याने आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. येत्या 5 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या  मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आहे.  त्यासाठी, सर्व तयारी सुरू असून आधी विधिमंडळ पक्षाची बैठक होईल, विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला जाईल आणि त्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा (Chief minister) उमेदवार जाहीर केला जाईल, असे रावसाहेब दानवे यांनी म्हटलं. जसं ठरलं तसं सुरू आहे, कोणताही वादविवाद आमच्यात नाही. मुख्यमंत्रीपदी कोण, हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. मात्र, मुख्यमंत्री कोण हे आमचं ठरलं आहे. मात्र, या टिप्पणीवर जोवर वरिष्ठांची सही होत नाही, तोवर अधिकृत रित्या प्रकाशित होत नाही असा आमच्या पार्टीचा विषय आहे, असे म्हणत दानवेंनी मुख्यमंत्रीपदाच्या नावाचा सस्पेन्स कायम ठेवला आहे.  


जोवर वरिष्ठांचा शिक्का बसत नाही तोवर मुख्यमंत्रीपदाचे नाव माहित असलं तरी जाहीर होणार नाही. पण, सगळं ठरल्याप्रमाणेच होणार आहे. प्रसंग, वेळ पाहून आम्ही सगळं करत असतो, वेळही ठरवली आहे, तारीखही ठरवली आहे. जो कोणी आमचा नेता निवडला जाईल तो आमचा मुख्यमंत्री असेल. सगळं ठरलं आहे, बॉसचा शिक्का झाला की सगळं समजेल. कार्यकर्त्यांप्रमाणे अनेकजण गोष्टी करत असतात, त्याला आमची मान्यता नसते, रक्ताने पत्र लिहिण्याने कोणी मुख्यमंत्री होत नाही, असे म्हणत रावसाहेब दानवे यांच्यासाठी रक्ताने पत्र लिहणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भावनांवरही दानवेंनी प्रतिक्रिया दिली. 


शिंदेंची नाराजी नाही, राऊतांना लगावला टोला


एकनाथ शिंदे यांची बिलकुल नाराजी नाही, केवळ वर्तमानपत्र आणि चॅनलला चाललेली बातमी आहे.  ते स्वतःच्या गावी गेले आहेत, म्हणून शंका उपस्थित करण्याचा प्रश्न नाही. त्यांना ताप आलाय, आरामाचा सल्ला दिलाय त्याच्यावर देखील शंका उपस्थित केली जाते आहे, असे स्पष्टीकरण रावसाहेब दानवे यांनी म्हटलं. दरम्यान, संजय राऊत म्हणतात एकनाथ शिंदेंचा चेहरा पडला, पण हे सारेच पडले तरी आम्ही त्यांच्याबद्दल बोलत नाही. त्यांना रुग्णालयात ऍडमिट करण्याची गरज आहे, अशा शब्दात रावसाहेब दानवे यांनी संजय राऊतांवर टीका केलीय.


हेही वाचा


ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल