Raosaheb Danve on Uddhav Thackeray : "मी जंगलातला शेर आहे. तुम्ही एकदा विधान परिषदेला निवडून आले, तेही मागच्या दाराने निवडून आलात. तुमच्यात दम आहे तर या लोकांमधून उभं राहून निवडून येऊन दाखवा" असे भाजपचे जालना लोकसभेचे उमेदवार रावसाहेब दानवे म्हणाले. एबीपी माझाशी बोलताना रावसाहेब दानवे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतलेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्यावर टीका केली होती. आता दानवेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 


रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) म्हणाले, हा पठ्ठ्या सात वेळा 35 वर्षे आमदार, खासदार राहिला. असे स्टेजवरचे आणि  व्हिडिओ कॉन्फरन्स बोलणारे नेते मी खूप पाहिले. आमचे कुटुंब आमचे जबाबदारी म्हणणारे मी खूप पाहिले. आम्ही यांच्यासारखं दरवाजे लावून मी बसत नाही. 


उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?


जालन्यात 5 टर्म म्हणजे 25 वर्ष  ते खासदार आहेत, त्यात जालन्यात मतदान कार्ड कचऱ्यात सापडले. कदाचित लोकांना प्रश्न पडले असेल कशाला याला निवडून द्यायचे. जालन्यातील लोकांनी आता रावसाहेब दानवेंना विचारावे आता तरी जाणार का, आता तिथं कल्याण पाहिजे कल्याण करायला, असं उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) म्हटलं होतं. संभाजीनगरात दारू वाला हवाय की पाणीवाला हवाय? जालन्यात आता रावसाहेबना विचारावे आता तरी जाणार का, आता तिथं कल्याण पाहिजे कल्याण करायला. महाराष्ट्राने मोदीजींना झुकवले आहे, शहेनशहासारखे सध्या ते फिरत आहेत. तुम्ही माझा पक्ष पळवला,चिन्ह चोरले माणसे फोडली तरी तुम्हाला उद्धव ठाकरेंनी भीती वाटते, असंही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगितले. 


जालन्यात रावसाहेब दानवेंविरोधात कल्याण काळेंना उमेदवारी 


भाजपकडून जालना लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आल्यानंतर काँग्रेस पक्षाने त्यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या कल्याण काळे यांना मैदानात उतरवले. याशिवाय अपक्ष उमेदवार मंगेश साबळे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने निवडणूक तिरंग होण्याची शक्यता आहे. शिवाय मराठा आरक्षणाचा मुद्दाही रावसाेब दानवे यांच्यासाठी डोकेदुखी ठरु शकतो. 




इतर महत्वाच्या बातम्या 


Uddhav Thackeray Speech : 'कधी मला डोळा मार, कधी पवारांना डोळा मार', पीएम मोदींच्या ऑफरवरुन उद्धव ठाकरेंचा कडाडून हल्लाबोल