Ramraje Naik Nimbalkar, फलटण : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशा चर्चा सुरु आहेत. मात्र, रामराजे निंबाळकर स्मार्ट खेळी करत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनाही खूश करण्याच्या तयारीत आहेत. रामराजे निंबाळकर हे अजित पवारांसोबतच राहणार आहेत. तर त्यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर आणि फलटण कोरेगावचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. फलटण येथे रामराजे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती आहे. 


रामराजे निंबाळकर विधानपरिषदेचे आमदार आहेत. त्यांचा 2 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालाय. मात्र, उर्वरित 4 वर्षांचा कालावधी बाकी आहे, त्यामुळे ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीतच राहतील असे बोलले जात आहे.  सातारा जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर आणि फलटणचे आमदार दीपक चव्हाण शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील. तर रामराजे अजित पवारांसोबतच राहतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 


रामराजे निंबाळकर काय काय म्हणाले?


रामराजे निंबाळकर म्हणाले, निर्णय महत्त्वपूर्ण नाहीत. गेल्या दीड वर्षात ज्या पद्धतीने या जिल्ह्यातील विशेष करून मान फलटण खटाव या तालुक्यात सत्ता राबवली गेली. त्यामुळे कार्यकर्त्यांना भ्रम होता की सत्तेत जाऊन महायुतीत जाऊन आपल्याला काय मिळालं त्यामुळे त्याचा हा परिणाम आहे. कार्यकर्त्यांना भोगाव लागत आहे. किती वेळा सांगितलं तरी त्यात काही फरक पडत नाही. वरून फोन आले आहेत. वरिष्ठांचे फोन आले आहेत असं सांगितलं जातं. गेल्या दीड वर्षात फक्त मीच टार्गेट झालो आहे. आमचं भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीची भांडण नाही. आम्हाला आमच्या स्थानिक राजकारणात पलीकडे कशाशी घेणं घेणं नाही. दिल्लीच सर्व अजितदादा वरिष्ठ नेते बघतील.


14 तारखेचा मेळाव्याची जबाबदारी  संजीवराजे यांनी घेतलीये 


पुढे बोलताना रामराजे निंबाळकर म्हणाले, कुठल्याही वरिष्ठ पातळीवरच्या नेतृत्वाबद्दल मी बोलणार नाही त्यांनी मला दिल्लीपासून बऱ्याच वेळा मदत केली आहे त्यामुळे पुन्हा कधीतरी मी याबद्दल बोलू. 14 तारखेचा मेळाव्याची पूर्ण जबाबदारी माझे सर्वात धाकटे भाऊ संजीव राजे यांनी घेतलेली आहे. जेव्हा माझा सर्वात मोठा भाऊ सांगतो की मी आता महायुतीत राहणार नाही. तेव्हा कुटुंब म्हणून मला कुठेतरी किंमत द्यावी लागते. दुसरे बंधू रघुनाथ राजे यांनी तर लोकसभेलाच त्यांची भूमिका जाहीर करून थेट विरोधात जाऊन स्टेजवर जाऊन काम केलेलं आहे. या सर्वच गोष्टींचे कारण हे रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांची एकूण वागण्याची पद्धत आणि आमच्या घराबद्दल असलेली असूया आहे. त्यांना स्वतःबद्दल प्रचंड अहंकार आहे. रणजीत नाईक निंबाळकर यांना माझ्यावर टीका करण्याची सवय आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या


Raj Thackeray SSC: राज ठाकरेंना 10 वीच्या बोर्ड परीक्षेत किती मार्क?; मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..