Ramesh Kadam : सध्या मी कोणत्याही पक्षाच्या नेतृत्वाखाली काम करत नाही. पण मोहोळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची माहिती मोहोळ तालुक्याचे माजी आमदार रमेश कदम (Ramesh Kadam) यांनी दिली.  याबाबत मतदारसंघातील लोकांशी बोलणार असल्याचेही ते म्हणाले. राजकारणात अशी ॲाफर सांगायची नसते असंही कदम म्हणाले. रमेश कदम यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची भेट घेतली. त्यानंतर रमेश कदम बोलत होते.


सध्या मी कोणत्याही पक्षाच्या नेतृत्वाखाली काम करत नाही


मी राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षात होतो. आता केवळ जयंत पाटील यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो होतो असंही रमेश कदम म्हणाले. 2019 साली मी तुरुंगात होतो. तेव्हा मला 24 हजार मत मिळाली होती असंही रमेश कदम म्हणाले. सध्या मी कोणत्याही पक्षाच्या नेतृत्वाखाली काम करत नाही असं ते म्हणाले. मी सध्या जामिनावर बाहेर आहे. मी मोहोळ मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे रमेश कदम म्हणाले.


रमेश कदमांच्या भेटीवर जयंत पाटील काय म्हणाले?


दरम्यान, रमेश कदम यांच्या भेटीबद्दल जयंत पाटील यांना देखील प्रसारमाध्यमांनी विचारले. यावेळी जयंत पाटील म्हणाले की, यापूर्वी देखील ते दोन तीन वेळा भेटले होते, एवढीच प्रतिक्रिया जंयत पाटील यांनी दिली. 


कोण आहेत रमेश कदम? (Who Is Ramesh Kadam) 


रमेश कदम हे 2014 साली राष्ट्रवादीच्या तिकिटावर मोहोळमधून निवडून आले होते. निवडून आल्यानंतर त्यांनी मागेल त्याला टँकर, मागेल त्याला शेततळे आणि मागेल त्या ठिकाणी रस्ता दिल्याने चांगलेच लोकप्रिय झाले. आण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळामध्ये झालेल्या घोटाळ्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. 


तुरुंगातही वादग्रस्त ठरले होते


रमेश कदम हे तुरुंगातही गेल्यानंतर चांगलेच वादग्रस्त ठरले होते. तुरुंगात असताना त्यांनी पोलिसांना केलेली शिविगाळ असो वा वादग्रस्त वक्तव्यामुळे ते नेहमी चर्चेत राहिले आहेत. रमेश कदम हे जवळपास आठ वर्षे तुरुंगात होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना जामीन मिळाल्यानंतर ते बाहेर आले. रमेश कदम हे मांतग समाजातून असून या समाजाची मोठी संख्या आहे. तसेच मोहोळ आणि पंढरपूर परिसरात रमेश कदम यांना मानणारा मोठा वर्ग आहे. तुरुंगात असताना ज्या ज्या वेळी ते जामीनातून बाहेर यायचे त्या त्यावेळी त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी व्हायची.


महत्वाच्या बातम्या:


Ramesh Kadam: मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांचा महायुतीला पाठिंबा, अण्णा भाऊ साठे महामंडळ कथित घोटाळ्याप्रकरणी होते तुरुंगात