मुंबई : महाराष्ट्रात सत्ताधारी महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चा सुरु आहेत. महायुतीत (Mahayuti) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना, भाजप (BJP)आणि अजित पवार (Ajit Pawar) यांची राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रमुख पक्ष आहेत. आरपीआय आठवले गट, जनसुराज्य  पार्टी हे महायुतीसोबत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीच्या नेत्यांच्या बैठकांचं सत्र सुरु आहे. अद्याप महायुतीच्या जागावाटपात कोणता पक्ष किती जागा लढणार हे स्पष्ट झालेलं नाही. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) महायुतीत आहेत. ते आरपीआय आठवले गटाचे अध्यक्ष आहेत. आरपीआय आगामी विधानसभा निवडणुकीत किती जागा लढवणार हे स्पष्ट झालेलं नाही. रामदास आठवले यांनी सांगितलं की एक आठवड्यापूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना 20-21 जागांची यादी सोपवली आहे. त्यापैकी किमान 8-10 जागा मिळाव्यात अशी मागणी केल्याचं रामदास आठवले म्हणाले.  


रामदास आठवले म्हणाले की जागा किती लढणार याची संख्या कमी जास्त होऊ शकते. मात्र, आरपीआयला राज्यातील सत्तेत वाटा मिळाला पाहिजे, असं त्यांनी म्हटलं. राज्यपाल नियुक्त कोट्यातून जे 12 आमदार विधानपरिषदेवर पाठवले जातात. त्यापैकी एक जागा आरपीआयला मिळावी, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली. याशिवाय 2-3 महामंडळं मिळाली पाहिजेत, असं देखील रामदास आठवले यांनी म्हटलं. 


रामदास आठवले पुढं म्हणाले की लोकसभा निवडणुकीसारखं वातावरण आता राज्यात नाही. आरपीआय आठवले गट महायुतीसोबत राहणार आहे. महायुतीला राज्यात 160 जागा मिळतील. लोकसभेला जे नुकसान झालं ते न होता विधानसभेला फायदा मिळेल, असं आठवले म्हणाले. 


बच्चू कडू यांनी सोबत यावं


रामदास आठवले यांनी तिसऱ्या आघाडीनं आमच्यासोबत यावं, असं म्हटलं. बच्चू कडू यांनी आमच्यासोबत राहायला हवं. आम्ही तिसऱ्या आघाडीत जाार नाही. कारण त्या आघाडीचा काहीच उपयोग नाही. एकट्यानं लढल्यावर विजय शक्य नतो. त्यासाठी तुमच्याकडे आघाडी असेल तर तुम्हा जास्त यशस्वी ठराल, असं म्हटलं. आम्ही ज्यांच्यासोबत असतो त्या आघाडीचा विजय निश्चित असतो, असं रामदास आठवले म्हणाले. 


रामदास आठवले यांनी लाडकी बहीण योजनेवर देखील भाष्य केलं. या योजनेचा प्रभाव राज्याच्या विधानसभा निवडणुीत ठरेल.   


दरम्यान, एकीकडे महायुतीच्या जागावाटपाची चर्चा सुरु असताना रामदास आठवले  यांनी केलेली 8-10 जागांची मागणी सत्ताधारी अथवा विरोधी पक्ष पूर्ण करतात का हे पाहावं लागेल.


इतर बातम्या :


Ajit Pawar : अजित पवारांची स्मार्ट खेळी,फोनवरुन दीपक चव्हाणांची उमेदवारी जाहीर, रामराजे खुदकन हसले,संभाव्य धोका टळला कारण...