Nilesh Lanke on Kalyan Kale : "मी लुकडा सुकडा पैलवान, कल्याण काळेंनी उमेदवारी घेतली नसती तर ती माळ माझ्या गळ्यात पडली असती. खासदार कल्याण काळे हे जायंट किलर आहेत. लोकसभा झाली आता राज्य ताब्यात पाहिजे. विधानसभेला अशी तयारी करायची की, समोरच्याचे डिपॉझिट जप्त झाले पाहिजे", असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे म्हणाले. छत्रपती संभाजीनगरमध्ये जालना लोकसभेचे खासदार कल्याण काळे यांचा सपत्निक सत्कार शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी खासदार निलेश लंके, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे उपस्थित होते.
यावेळी खासदार कल्याण काळे हे भाषण सुरू होण्यापूर्वी नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे नाव घेत होते, त्याच वेळी शरद पवार यांनी कल्याण काळे यांना त्याठिकाणी पत्नीचे नाव घेण्याचे सांगितले आणि अखेर कल्याण काळे यांनी त्यांची पत्नी रेखा काळे यांचे नाव घेतले. बाळासाहेब थोरात म्हणाले, राज्य सरकार टक्केवारी वर चालले आहे. कल्याण काळे आणि निलेश लंके यांनी आपले प्रश्न लोकसभेत मांडावे. केंद्रातील भाजप सरकार लोकशाही बुडवायला निघाले आहे, चातुर्वर्ण्य, मनुस्मृती त्यांना आणायची आहे.
निलेश लंके यांनी शपथ इंग्रजीत घेतली आणि शेवटी रामकृष्ण हरी म्हणाले
कल्याण काळे म्हणाले, जालना जिल्ह्याच्या इंडेक्स बघितला तर शेवटचा नंबर लागतो. देशाचे संविधान वाचवण्याचे काम शरद पवार यांनी केले. निलेश लंके यांनी शपथ इंग्रजीत घेतली आणि शेवटी रामकृष्ण हरी म्हणाले. बरे झाले वाजवा तुतारी म्हणाले नाही. दुधाच्या दरा संदर्भात शरद पवार यांनी बाजू घ्यावी. मनोज जरांगे यांनी जे आंदोलन सुरू केले आहे, त्या बाबत भूमिका शरद पवार यांनी घेतली पाहिजे, असंही कल्याण काळे म्हणाले.
शरद पवार म्हणाले, इथं कोणी उभा राहावं अशी चर्चा झाली त्यात राजेश टोपे यांचं नाव आलं. यावेळी त्यांनी चातुर्य दाखवलं त्यांनी माळ काळे यांच्या गळ्यात टाकली. यावेळी सुटलाय पुढच्या वेळी पाहतो. प्रत्येक वेळी सगळे आघाडीचे लोक एकत्र काम करत नाहीत पण या निवडणुकीत यावेळी आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी एकत्र काम केले.
इतर महत्वाच्या बातम्या