Raj Thackeray Uddhav Thackeray: महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वात ऐतिहासिक घटना म्हणून पाहिल्या जाणाऱ्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे मनोमिलन अवघ्या काही क्षणांवर येऊन ठेपले आहे. वरळीच्या डोममध्ये मनसे-ठाकरे गटाचा विजयी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे हे तब्बल 20 वर्षांनी एकत्र येणार आहेत. हा सोहळा ठाकरे बंधूंच्या राजकीय मनोमीलनाची नांदी ठरणार आहे. त्यामुळे ठाकरे गट आणि मनसेच्या राज्यभरातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मुंबईतील वरळी डोम येथे दाखल झाले आहेत. त्यामुळे सध्या या परिसरात प्रचंड गर्दी झाली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना येण्यासाठी आणखी तासभराचा अवधी आहे. मात्र, त्यापूर्वीच वरळी डोमचे सभागृह हाऊसफुल्ल झाले आहे.
या सोहळ्याला मनसे आणि ठाकरे गटाचे हजारो कार्यकर्ते आले आहेत. मात्र, आता सभागृह भरल्याने पोलिसांकडून मोजक्या नेत्यांशिवाय कोणालाही आत सोडले जात नाही. त्यामुळे वरळी डोमच्या मार्गावर ट्रॅफिक जाम झाले आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून ठाकरेंचे समर्थक येत असल्याने या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सध्या वरळी डोमच्या गेटवर तुफान गर्दी झाली आहे. मनसे आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनाही आतमध्ये प्रवेश करणे कठीण झाले आहे. आतमध्ये जाण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असलेल्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांची प्रचंड दमछाक होत आहे.
Thackeray Camp & MNS: वरळी डोममध्ये ठाकरे गट-मनसे कार्यकर्त्यांचे मनोमिलन
वरळी डोममध्ये ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी झाली आहे. अगदी अलीकडेपर्यंत एकमेकांच्या वाऱ्यालाही उभे न राहणारे ठाकरे गट आणि मनसेचे कार्यकर्ते वरळी डोममध्ये सध्या आनंदाने एकमेकांच्या गाठीभेटी घेत आहेत. एकमेकांना पेढे भरवत आहेत. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर हे सगळे एकमेकांपासून दूर झाले होते. मात्र, आता ठाकरे बंधू एकत्र आल्याने शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्त्यांनाही आनंद झाला आहे. त्यामुळे वरळी डोममध्ये सध्या अनोखे चित्र पाहायला मिळत आहे.
Raj Thackeray: राज ठाकरे-उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाणार
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे थोड्यावेळात आपापल्या घरातून विजयी मेळाव्यासाठी वरळीच्या दिशेने निघणार आहे. त्यापूर्वी उद्धव ठाकरे हे प्रथम दादर येथील राज ठाकरे यांच्या घरी जाण्याची शक्यता आहे. तेथून हे दोन्ही बंधू शिवाजी पार्कवरील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊ शकतात. हे दृश्य पाहण्यासाठी दादर परिसरात मनसे-ठाकरे गटाच्या समर्थकांची गर्दी झाली आहे.
आणखी वाचा