Raj Thackeray Speech :  " माझी महाराष्ट्रातील लोकांकडून अपेक्षा आहे की, जनतेकडून व्याभिचाराला राज मान्यता मिळू नये. तस झालं तर पुढचे दिवस भीषण आहेत.  वाटाघाटी सुरु होत्या तेव्हा मी यांना सांगितलं मला विधानपरिषदही नको आणि राज्यसभा नको. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा देत आहे. असं मी जाहीर करतो, असं मनसेप्रमुख राज ठाकरे म्हणाले. शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पाडवा मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते.


येणारी निवडणूक या देशाचे भविष्य ठरवणार आहे


राज ठाकरे म्हणाले, मला महाराष्ट्रातील शेतकरी जीन्स घालून ट्रॅक्टरवर बसलेला हवा आहे. आज सर्वात तरुण देश हा भारत देश आहे. सर्वाधिक तरुण अमेरिका किंवा जपान नाही, तो आपला भारत आहे. तरुण तरुणींना चांगल्या शिक्षणाची गरज आहे. तंत्रज्ञानाची गरज आहे. उत्तम नोकऱ्यांची गरज आहे. उत्तम व्यवसायाची गरज आहे. त्यासाठी मार्गदर्शनाची गरज आहे. त्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने काम केलं पाहिजे. माझी नरेंद्र मोदींकडून अपेक्षा आहे. भारतातील तरुणांकडे लक्ष द्या. तेच भविष्य आहेत. प्रत्येक देशाचा काळ येतो. जपानमध्ये काळ आला. तिथे अनेक कंपन्या उभ्या राहिल्या व्यवसाय उभे राहिले. देश घुसळून निघाला. तसाच हा देश देखील घुसळून निघाला पाहिजे. उद्या जर तसं घडलं नाही, तर या देशामध्ये अराजक येईल. नोकऱ्या, व्यवसाय उपलब्ध झाले नाहीत तर काय होईल. 6 लाख उद्योगपती देश सोडून गेले. तस होता कामा नये. महाराष्ट्र सर्वाधिक कर भरतो, त्यात मोठा वाटा महाराष्ट्राला आला पाहिजे. ही माझी नरेंद्र मोदींकडून अपेक्षा आहे. निवडणूक देशाचे भविष्य ठरवणार आहे.


महाराष्ट्रातील लोकांवर, मराठी माणसावर , मराठी भाषेवर टोकाचं प्रेम करतो


पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, मी जे ऐकत होतो. ते 5 वर्षात दिसत नाहीये. ज्या गोष्टी मला पटलेल्या नाहीत ते पटलेल्या नाहीत. ज्या गोष्टी चांगल्या वाटल्या त्याच कौतुक करणार नाही आवडल्या तर टीका करणार आहेच. माझा राग टोकाचा आहे. महाराष्ट्रातील लोकांवर, मराठी माणसावर , मराठी भाषेवर टोकाचं प्रेम करतो. मात्र, मला तशी गोष्ट दिसली नाही तर स्वत: विरोध करतो. 370 कलम रद्द झालं तेव्हा अभिनंदन केलं. ज्या गोष्टी चांगल्या घडल्या त्याच अभिनंदन केलं. ज्यावेळी एक माणूस एका प्रांताचा विचार करतोय नाही म्हटलं. मी कधीही व्यक्तीगत टीका करतो. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत नरेंद्र मोदींवर व्यक्तीगत टीका करतात. मी तशी केली नाही. मुख्यमंत्री पद मिळालं नाही म्हणून मी टीका करत नाही. तुम्हाला सत्तेत हाकलून दिलं म्हणून तुम्ही त्यांच्यावर टीका करतात. तुम्हाला काय हवंय हे सांगण्यासाठी आणि मांडण्यासाठी मी आलोय. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Raj Thackeray Speech : मला म्हटले आमच्यावर चिन्हावर लढा, अमित शाहांच्या भेटीत काय घडलं राज ठाकरेंनी भर सभेत सांगितलं