Raj Thackeray's expectations from PM MODI : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला. मात्र, यावेळी मोदींकडून काही अपेक्षा असल्याचेही सांगितले. राज ठाकरेंनी पीएम मोंदीकडून कोणकोणत्या अपेक्षा व्यक्त केल्या जाणून घेऊयात...


काय म्हणाले राज ठाकरे?


राज ठाकरे म्हणाले, मला महाराष्ट्रातील शेतकरी जीन्स घालून ट्रॅक्टरवर बसलेला हवा आहे. आज सर्वात तरुण देश हा भारत देश आहे. सर्वाधिक तरुण अमेरिका किंवा जपान नाही, तो आपला भारत आहे. तरुण-तरुणींना चांगल्या शिक्षणाची गरज आहे. तंत्रज्ञानाची गरज आहे. उत्तम नोकऱ्यांची गरज आहे. उत्तम व्यवसायाची गरज आहे. त्यासाठी मार्गदर्शनाची गरज आहे. त्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने काम केलं पाहिजे. माझी नरेंद्र मोदींकडून अपेक्षा आहे. भारतातील तरुणांकडे लक्ष द्या. तेच भविष्य आहेत. प्रत्येक देशाचा काळ येतो. जपानमध्ये काळ आला. तिथे अनेक कंपन्या उभ्या राहिल्या व्यवसाय उभे राहिले. देश घुसळून निघाला. तसाच हा देश देखील घुसळून निघाला पाहिजे. उद्या जर तसं घडलं नाही, तर या देशामध्ये अराजक येईल. नोकऱ्या, व्यवसाय उपलब्ध झाले नाहीत तर काय होईल. 6 लाख उद्योगपती देश सोडून गेले. तस होता कामा नये. महाराष्ट्र सर्वाधिक कर भरतो, त्यात मोठा वाटा महाराष्ट्राला आला पाहिजे. ही माझी नरेंद्र मोदींकडून अपेक्षा आहे. निवडणूक देशाचे भविष्य ठरवणार आहे. 


मी गुजरातला गेलो, मी गुजरात पाहिला


राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, काँग्रेस वाल्यांबरोबर माझ्या भेटी होत्या. पण गाठी पडल्या त्या भाजपवाल्यांच्या त्यामुळे तेव्हापासून त्यांच्या बरोबर माझे चांगले संबंध प्रस्थापित झाले. प्रमोदजी गेले. त्यानंतर मी गुजरातला गेलो. मी गुजरात पाहिला. त्यावेळी नरेंद्र मोदींशी माझे चांगले संबंध प्रस्थापित झाले. मी गुजरातमध्ये पाहिले की, कशाप्रकारची डेव्हलपमेंट होते. ही प्रगती आणि डेव्हलपमेंट मी पाहात होतो. त्यानंतर महाराष्ट्रात आल्यानंतर मला पत्रकारांनी प्रश्न विचारले. म्हटलं गुजरात डेव्हलप होतोय पण महाराष्ट्र खूप पुढे आहे. जसे जसे माझे संबंध प्रस्थापित झाले, त्यानंतर नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान व्हावेत, असं सांगणारा राज ठाकरे पहिला माणूस होता. तोपर्यंत त्यांच्याही पक्षातील कोण बोलले नव्हते. मला वाटलं स्वत:चा विचार असतो. माणसं बोलत असतात. व्यक्त होतात. 


मी जे ऐकत होतो ते 5 वर्षात दिसत नाही


2014 ची निवडणूक झाली त्यानंतर मी जे ऐकत होतो ते 5 वर्षात दिसत नाही. मला बुलेट ट्रेन आणि नोटबंदी दिसतीये. तुम्हाला आजही सांगतो ज्या गोष्टी पटल्या नाहीत, त्या पटल्या नाहीत. ज्या गोष्टी मला चांगल्या वाटल्या त्याचे स्वागत करणार आहे. ज्या पटल्या नाहीत त्याचा विरोध करणार आहे.  20 वर्षानंतर एका माणसाच्या हातात बहुमताने सत्ता आली. त्यानंतर मी विचार करत होतो. या देशात काय काय होईल? काय काय गोष्टी घडू शकतात. प्रेम होतं, विश्वास होता. त्याला तडा जाईल, असं दिसायला लागलं. तेव्हा  राग आला. मी महाराष्ट्रावर प्रेम करतो. महाराष्ट्रातील लोकांवर प्रेम करतो. मराठी भाषेवर प्रेम करतो. टोकाचं प्रेम करतो. जर विश्वास संपला तर टोकाचा विरोध करतो. टोकाचा विरोध 2019 मध्ये केला, असंही राज ठाकरे असंही राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.