Raj Thackeray On Satyacha Morcha Mumbai मुंबई: मतदारयाद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीविरोधात महाविकास आघाडी आज (1 नोव्हेंबर) एल्गार पुकारला. महाविकास आघाडी आणि मनसे आज मुंबईत आयोगाविरोधात सत्याचा मोर्चा (Satyacha Morcha Mumbai) काढण्यात आला. या मोर्च्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray), शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, बाळासाहे थोरात यांच्यासह मनसे आणि महाविकास आघाडीमधील अनेक नेते सहभागी झाले.

Continues below advertisement


विरोधकांच्या सत्याच्या मोर्चात हजारो लोकांनी गर्दी केली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, शर्मिला ठाकरे, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार यांनी फॅशन स्ट्रीटपासून मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत पायी चालत सत्याच्या मोर्चात सहभाग नोंदवला. यानंतर मुंबई महापालिका मुख्यालयासमोर सभा झाली. यासभेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भाषण करत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. राज ठाकरेंनी यावेळी विविध मतदारसंघातील दुबार मतदारांची नावं वाचली. कोणत्या मतदारसंघामध्ये किती दुबार मतदार आहे, याचा आकडाच राज ठाकरेंनी सगळ्यांसमोर सांगितला. तसेच साडेचार मतदार कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाडमधील मतदारांनी थेट मलबार हिल मतदारसंघात येऊन मतदान केल्याचा दावा राज ठाकरेंनी केला.  


आधी नावं वाचली, मग माणसं उभी केली, राज ठाकरेंनी नेमकं काय केलं? (Raj Thackeray On Satyacha Morcha Mumbai)


सगळे बोलत आहेत दुबार मतदार आहेत. आम्ही बोलतोय, भाजपचे लोक बोलताय, अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील लोक बोलताय...मग निवडणुका घ्यायची घाई का?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. मतदार याद्या साफ करा, पारदर्शक याद्या केल्यावर यश-अपयश कोणाचं, हे स्पष्ट होईल, असं राज ठाकरे म्हणाले. यावेळी राज ठाकरेंनी सभेत दुबार मतदारांचा पुरावा देखील दिला. आज मी इकडे पुरावा घेऊन आलो आहे. दुबार मतदारांना घेऊन आलोय, असं म्हणत राज ठाकरे यांनी दुबार मतदारांच्या याद्यांच्या कागदपत्रांचा डोंगर दाखवला. यावेळी उद्धव ठाकरे आणि शरद पवार देखील पाहात बसले. राज ठाकरेंनी सभेसाठी उपस्थित असलेल्या माणसांमध्ये दुबार मतदारांच्या याद्यांची कागदपत्रं ठेवली होती. ही सर्व दुबार मतदार आहेत. जेव्हा कधी निवडणुका होतील तेव्हा याद्यांवर काम करा, प्रत्येक चेहरा समाजाला पाहिजे. दुबार-तिबार तिथे आले, तर तिथेच फोडून काढा आणि मग पोलिसांच्या ताब्यात द्या, असा सूचना राज ठाकरेंनी यावेळी दिल्या. 


कोणत्या मतदारसंघामध्ये किती दुबार मतदार?, राज ठाकरेंनी सांगितला आकडा-


मुंबई उत्तर पूर्व 92,983 दुबार मतदार


उत्तर मध्ये 63,740 दुबार मतदार 


दक्षिण मध्ये  50,565 मतदार


दक्षिण मुंबई 55,205 दुबार मतदार


नाशिक लोकसभा 99,673 दुबार मतदार


मावळ 1,45,636 दुबार मतदार


राज ठाकरे काय काय म्हणाले? (Raj Thackeray Speech Satyacha Morcha Mumbai )


नव्याने सांगण्यासाठी काही नाही. 
याआधीच अनेकवेळा बोललो आहे.
एवढ्या मोठ्या संख्येने आल्याबद्दल सगळ्यांचे आभार
सगळे बोलत आहेत दुबार मतदार आहेत.
भाजपचे लोक देखील तेच म्हणताय.
अजित पवारांची लोक म्हणायची दुबार मतदार आहेत. 
मग निवडणूक घेण्याची घाई का?
मतदार याद्या साफ करा.
पारदर्शक याद्या केल्यावर यश अपयश कोणाच स्पष्ट होईल. 
सगळं लपून छापुन सुरू आहे.
साडेचार मतदार कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाडमधील मतदारांनी थेट मलबार हिल मतदारसंघात येऊन मतदान केलं.
मी सर्व दुबार मतदारांची यादी आणली आहे.
लाखो लोक मतदानासाठी वापरले गेले.
आज दुबार मतदारांचा दुबार मतदार आणले.
कागदपत्रांच्या डोंगर दाखवला. हेच दुबार मतदार आहेत, असं राज ठाकरे म्हणाले.




संबंधित बातमी:


Satyacha Morcha Mumbai: फॅशन स्ट्रीट ते मुंबई महापालिका मुख्यालय...मनसे अन् महाविकास आघाडीचा सत्याचा मोर्चा; गर्दी किती?, पाहा Photo's