Mahavikas Aghadi Mumbai Morcha : मुंबईत आज (1 नोव्हेंबर) महाविकास आघाडीसह (Mahavikas Aghadi) विरोधी पक्षांनी एकत्र येत 'सत्याचा मोर्चा' (Satyacha Morcha in Mumbai) काढला आहे. या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेसचे (SP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे तिन्ही नेते या मोर्चाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर येणार आहेत. दरम्यान, या मोर्चासाठी एकीकडी जय्यत तयारी करण्यात आली असताना महाविकास आघाडीच्या आंदोलनात सहभागी होण्यावरुन मुंबई कांग्रेस आणि महाराष्ट्र कांग्रेसमध्ये गटबाजी दिसून आली आहे.
मुंबई कांग्रेसकडून कार्यकर्त्यांना मोर्चात सहभागी होण्यासंदर्भात अधिकृत मॅसेजच आले नसल्याची माहिती पुढे आली आहे. महाराष्ट्र काँग्रेसकडून सहभागी होण्यास कार्यकर्त्यांना सांगण्यात आले असले तरी मुंबई काँग्रेसचा स्वतंत्र दर्जा असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तर कांग्रेसचे काही मोजके कार्यकर्ते मोर्चाला उपस्थित राहणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
Congress : हर्षवर्धन सपकाळ यांची या मोर्चा अनुपस्थिती, राहुल गांधींचाच मुद्दा राज ठाकरेंनी घेतला?
तर दुसरीकडे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची या मोर्चा अनुपस्थिती असणार आहे. बिहार विधानसभा निवडणुका आणि राज ठाकरेंकडे मोर्चाचे नेतृत्व असल्याने कांग्रेसचा सहभागी होण्यावरुन हर्षवर्धन सपकाळ यांनी सावध पवित्रा घेतल्याची चर्चा आहे. राहुल गांधींचाच मुद्दा राज ठाकरेंनी घेतल्याने कांग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये सहभागी होण्यावरुन संभ्रम असल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे, सिल्लोडमध्ये शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी बंद क्वार्टरमध्ये 500 हून अधिक मतदार नोंदवल्याचा आरोप भाजपने केल्याने महायुतीतही मतभेद समोर आले आहेत. निवडणूक आयोगाने याद्या साफ करेपर्यंत निवडणुका घेऊ नयेत, या आघाडीच्या मागणीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून, 'चित भी मेरी पट भी मेरी' अशी भूमिका घेऊ नये, असा टोला लगावण्यात आला आहे.
मोर्चात कोण कोण उपस्थित राहणार? पाहा यादी-(Who will be present at the morcha?)
शरद पवार, राष्ट्रवादी(शप)उद्धव ठाकरे, शिवसेना(उबाठा)राज ठाकरे, मनसेविजय वडेट्टीवार,काँग्रेसबाळासाहेब थोरात,काँग्रेससुप्रिया सुळे,राष्ट्रवादी(शप)जितेंद्र आव्हाड,राष्ट्रवादी(शप)जयंत पाटील,राष्ट्रवादी(शप)रोहित पवार,राष्ट्रवादी(शप)शशिकांत शिंदे,राष्ट्रवादी(शप)आदित्य ठाकरे,शिवसेना(उबाठा)बाळा नांदगावकर, मनसेजयंत पाटील, शेकापप्रकाश रेड्डी, भाकपअनिल परब,शिवसेना(उबाठा)अनिल देसाई, शिवसेना(उबाठा)अरविंद सावंत, शिवसेना(उबाठा)राजन विचारे , शिवसेना(उबाठा)सचिन अहिर , शिवसेना(उबाठा)अंबादास दानवे, शिवसेना(उबाठा)सुनील प्रभू, शिवसेना(उबाठा)सुनील शिंदे, शिवसेना(उबाठा)अविनाश अभ्यंकर, मनसेनितीन सरदेसाई, मनसेसंदीप देशपांडे, मनसेअविनाश जाधव,मनसेनसीम खान, काँग्रेससचिन सावंत, काँग्रेसअमीन पटेल, काँग्रेस
संबंधित बातमी: